शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत : पंचायत बरी म्हणण्याची वेळ आल्याच्या प्रतिक्रिया

By admin | Updated: July 20, 2016 01:20 IST

प्रशासनाच्या लालफितीत नागरी सुविधांना ब्रेक

दिंडोरी : नगरपंचायतीची पहिली निवडणूक होऊन सहा महिन्यांचा काळ उलटला असला तरी येथे कायमस्वरूपी प्रशासकीय अधिकारी न मिळाल्याने विकासकामे तर सोडाच साधी दुरु स्तीचीही कामे होत नसल्याने पदाधिकारी प्रभारी प्रशासनाच्या लालफिती कारभारापुढे हतबल झाल्याचे चित्र आहे. प्रभारी मुख्याधिकारी व पदाधिकारी यांच्यात दुरावा निर्माण होत असून त्याचा परिपाक मुख्याधिकारी यांच्या कार्यमुक्तीच्या ठरावापर्यंत गेला आहे.जोपर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकारी व अभियंता दिले जात नाही तोपर्यंत नगरविकास ठप्प च राहण्याची चिन्ह आहे़ नागरिकांना विविध समस्यांना तर पदाधिकारी नगरसेवकांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.नगरपंचायत पेक्षा ग्रामपंचायत बरी होती म्हणण्याची वेळ आली आहे. शासनाने कायमस्वरूपी प्रशासकीय अधिकारी देण्याची गरज आहे.दिंडोरी नगरपंचायत होण्यास तांत्रिक विलंब झाल्याने आठ महिने प्रशासकीय कारकीर्द तर आता निवडणूक होऊन सहा महिने उलटले तरी कारभार सुरळीत झालेला नाही़ शासनाने ग्रामपंचायतींचे नगरपंचायती मध्ये रूपांतर केले परंतु त्यासाठी अधिकारी वर्ग व कामकाजाची रूपरेषा न ठरवल्याने कामकाज लाल फितीत अडकले आहे.प्रभारी मुख्याधिकारी व प्रभारी अभियंता यांची नेमणूक केली असती तरी ते दोन दिवस येत असून त्यांना कामकाज करण्यात मर्यादा येत आहे. अधिकारी येऊ न शकल्यास अनेक वेळा विविध दाखले मिळण्यास विलंब होत जनतेची गैरसोय होत आहे.सुरवातीला नागरिक समस्या घेऊन आले की कारभार नवीन आहे थांबा म्हणून त्यांची बोळवण होत होती सहा महिने उलटूनही देखभाल दुरुस्तीचे साहित्य खरेदी झाले नसल्याने नगरसेवकांना पदरमोड करत पाईपलाईन स्ट्रीट लाईट दुरु स्ती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होत नाही त्यासाठी उपाय योजना आवश्यक आहे. आरोग्य विभागाचीही परिस्थिती वेगळी नसून साथीच्या रोगांचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी उपाययोजना आवश्यक आहे. मासिक सभा फार्स ठरत आहे. कामकाजात गती येत नसल्याने पदाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यात दुरावा वाढत आहे. त्यातूनच सत्ताधारी गटाने सभेत त्यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव करत कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे़ तर विरोधी नागरी आघाडीने मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करत चर्चेतून मार्ग काढण्याची भूमिका घेत प्रभारी मुख्याधिकारी यांना कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. शासनाने पदांना मान्यता देत त्याच्या भरतीची प्रक्रि या तीन महिन्यात पूर्ण करण्याचे सूतोवाच केल्याने कायमस्वरूपी अधिकारी मिळत कामकाज सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. (वार्ताहर)