खून प्रकरणातील फरार संशयिताला अटक

By Admin | Updated: August 1, 2014 01:06 IST2014-07-31T22:30:51+5:302014-08-01T01:06:14+5:30

खून प्रकरणातील फरार संशयिताला अटक

The murder suspect arrested in the murder case | खून प्रकरणातील फरार संशयिताला अटक

खून प्रकरणातील फरार संशयिताला अटक


पंचवटी : पेठरोड (फुलेनगर) येथे राहणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या हत्त्येप्रकरणात फरार असलेल्या विशाल भालेराव या संशयिताला पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने म्हसरूळ येथून अटक केली. मंगळवारी रात्री भालेराव हा म्हसरूळ परिसरात असल्याबाबत माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी सापळा रचून भालेराव याला ताब्यात घेतले आहे. गेल्या आठवड्यात फुलेनगर पाण्याच्या पाटाजवळ राहणाऱ्या सोनू नभी भरसाबर याची पूर्ववैमनस्यातून विशाल भालेराव व अक्षय छाबरिया या दोघांनी हत्त्या केली होती. पोलिसांनी अक्षय छाबरिया याला अटक केली, तर भालेराव फरार होता. भालेराव हा म्हसरूळ परिसरात असल्याबाबत माहिती मिळताच पंकज पवार, हवालदार विजय गवांदे, नीलेश पवार, येवाजी महाले आदिंनी म्हसरूळ येथे सापळा रचून भालेराव याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: The murder suspect arrested in the murder case