शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या उपकार्यालयाला ठोकले टाळे

By admin | Updated: March 31, 2017 23:14 IST

सिडको : घरपट्टीपोटी मोठ्या प्रमाणात दंडाच्या नोटिसा बजावल्याने संतप्त ग्रामस्थांनी अंबड येथील मनपाच्या उपकार्यालयाला टाळे ठोक आंदोलन केले.

सिडको : अंबड येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या जागेवर उभारलेल्या पत्र्याच्या शेडला महापालिका व नाशिक तहसील कार्यालयाच्या वतीने घरपट्टीपोटी मोठ्या प्रमाणात दंडाच्या नोटिसा बजावल्याने संतप्त ग्रामस्थांनी अंबड येथील मनपाच्या उपकार्यालयाला टाळे ठोक आंदोलन केले. अंबड येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने औद्योगिक प्रयोजनासाठी संपादित केल्या असून, राहिलेल्या छोट्याशा जागेवर प्रकाल्पग्रस्त शेतकऱ्यांनी किरकोळ स्वरूपात बांधकाम करून त्या भाड्याने देत त्यांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु याच जागेवर मनपा तसेच नाशिक तहसील कार्यालयाच्या वतीने घरपट्टीपोटी मोठ्या प्रमाणात दंडाच्या नोटिसा बजावल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रकल्पग्रस्त समितीचे मुख्य प्रवर्तक साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली अंबड येथील मनपाच्या उपकार्यालयाला टाळे ठोक आंदोलन केले. याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून, मनपाचे अधिकारी, कर्मचारी हे कायमच बांधकामाची मोजणी करून दंडात्मक कारवाई करण्याची भीती शेतकऱ्यांना दाखवितात. सदर दंडात्मक कारवाईच्या नोटिसा ह्या अन्यायकारक असल्याने त्या मागे घ्याव्यात. तसेच शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांना मोफत घरे तसेच त्यांना घरपट्टी व पाणीपट्टीदेखील नसून त्यांच्यावर मात्र कु ठलीही कारवाई केली जात नसल्याचेही निवेदनात म्हटले  आहे. शेतकरी  हे बिनशेती कराचा मूळ आकार तसेच मनपाची रीतसर घरपट्टी भरण्यास तयार असून, त्यावर लावण्यात आलेला दंड माफ करून दिलेल्या नोटिसा रद्द कराव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी शांताराम दातीर, गोकूळ दातीर, सतीश दातीर, महेश दातीर, शांताराम फडोळ, एकनाथ मोरे, सुनील यादव, बाजीराव दातीर यांसह ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)एकीकडे शासनाकडून अंबड परिसरात कोणत्याही सुविधा दिल्या नसतानाही मोठ्या प्रमाणात कर आकारला आहे. हा एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय आहे. याबाबत शासनाने दिलेल्या दंडाच्या नोटिसा रद्द कराव्यात तसेच दंड माफ करून सकारात्मक विचार न केल्यास यापुढील काळात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडणार.- साहेबराव दातीर, मुख्य प्रवर्तक, प्रकल्पग्रस्त समिती