शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल विक्रीत मनपा, पोलिसांचा अडसर ; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 17:24 IST

कोरोनामुळे सुरक्षित अंतर रहावे म्हणून बाजार समिती सर्व शेतमाल आवारात विक्रीस परवानगी देत नसल्याने अनेक शेतकरी रस्त्यावर वाहने उभी करून येणाऱ्या ग्राहकांना थेट शेतमालाची विक्री करतात. मात्र शहर पोलीस व महापालिका कर्मचारी शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलत शेतमाल विक्रीत मज्जाव करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, अशाप्रकारे बाजार समिती, मनपा व पोलिसांकडून शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

ठळक मुद्देपंचवटी परिसरात शेतमाल विक्रीत शेतकऱ्यांना अडचणपोलीस, मनपा कर्मचाऱ्यांकडून विक्री करण्यास मज्जावशेतकऱ्यांचा जिल्हाभरात रास्तारोको करण्याचा इशारा

नाशिक : जिल्ह्यातील शेतकरी पेठरोड व दिंडोरीनाक्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमाल विक्रीस आणतात. परंतु, कोरोनामुळे सुरक्षित अंतर रहावे म्हणून बाजार समिती सर्व शेतमाल आवारात विक्रीस परवानगी देत नसल्याने अनेक शेतकरी रस्त्यावर वाहने उभी करून येणाऱ्या ग्राहकांना थेट शेतमालाची विक्री करतात. मात्र शहर पोलीस व महापालिका कर्मचारी शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलत शेतमाल विक्रीत मज्जाव करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, अशाप्रकारे बाजार समिती, मनपा व पोलिसांकडून शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. पंचवटी परिसरात शेतमाल विक्रीस पोलीस व नाशिक महापालिका मनाई करतानाच मारहाण व अर्वाच्य भाषेत बोलत वाहनांच्या काचेवर काठ्या मारण्यापर्यंत अरेरावीची भूमिका घेतात. तसेच शेतमाल व शेतकऱ्यांच्या जाळ्याही जप्त करतात. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना आत प्रवेश देत नाही व पोलीस आणि नाशिक महापालिका रस्त्यावर शेतमाल विक्री करू देत नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. प्रत्यक्षात सरकारने देशातील शेतकरी आपला शेतमाल कुठेही, कोणत्याही शहरात व बाजारपेठेत विक्री करू शकतो यासाठी अध्यादेश काढला आहे. असे असताना नाशिक शहरात मात्र याउलट परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक महापालिका व पोलीस वाहन दिसले की शेतकऱ्यांना अक्षरश: आपली वाहने घेऊन पळत सुटावे लागते. एखाद्या अट्टल गुन्हेगारापेक्षाही शेतकऱ्यांना वाईट वागणूक दिली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, अशाप्रकारे अन्यायकारक कारवाया थांबविल्या नाहीत जिल्हाभरातील शेतकरी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकBJPभाजपाFarmerशेतकरीPoliceपोलिसAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती