शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई नाका पोलिसांना अवैध धंद्यांचे आव्हान!

By admin | Updated: January 31, 2016 22:51 IST

झोपडपट्ट्यांमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण

संजय शहाणे इंदिरानगरमुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील झोपडपट्ट्यांमधील अवैध धंद्यांबाबतची वाढती स्पर्धा व त्यास असलेला राजकीय पाठिंबा असे दुहेरी आव्हान मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांच्यासमोर असून, या आव्हानास सामोरे जाण्यासाठी ते कोणते पाऊल उचलतात, यावरच या परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणार की नाही याचे भवितव्य अवलंबून असणार आहे़इंदिरानगर, भद्रकाली, अंबड व सरकारवाडा या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून मुंबई नाका पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली़ पोलीस ठाण्याच्या शुभारंभाप्रसंगीच दंगलीचा गुन्हा दाखल होऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांना भारतनगर झोपडपट्टीतील गुंडांनी एकप्रकारे सलामीच दिली़ इंदिरानगर पोलीस ठाण्याची डोकेदुखी असलेला भारतनगर, शिवाजीवाडी, नंदिनीनगर हा परिसर मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत समाविष्ट झाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़या परिसरातील मटका, जुगार, मद्यविक्री या अवैध धंद्यांवर पोलिसांकडून धातूर-मातूर स्वरूपाची कारवाई केली जात असल्याने या धंद्यांमध्ये वाढ होत चालली आहे़ या अवैध धंद्यांच्या स्पर्धेतून हाणामारीच्या घटना तर नित्याच्याच झाल्या असून, यादीवरील सराईत गुन्हेगारांचा मुक्त वावर या परिसरात असल्याचे पोलिसांच्या आॅपरेशनमधून समोर आले आहे़ जनावरांच्या हांडांच्या अनधिकृत गुदामांचा प्रश्न मोठा असून ही गुदामे हटविण्याची मागणीही नागरिकांनी अनेकदा केली आहे़भारतनगर परिसरात अनेक वर्षांपासून सुरू असलेला अनैतिक व्यवसाय, महापालिकेच्या जागांची खरेदी-विक्री करणारी टोळी अन् या सर्वांना असणारा राजकीय पाठिंबा या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचे काम मुंबई नाक्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना करावे लागणार आहे़