गोदाघाटावरील टपऱ्या हलविल्या

By Admin | Updated: August 1, 2014 01:06 IST2014-07-31T22:06:13+5:302014-08-01T01:06:46+5:30

गोदाघाटावरील टपऱ्या हलविल्या

Moves on the Godaghat | गोदाघाटावरील टपऱ्या हलविल्या

गोदाघाटावरील टपऱ्या हलविल्या


नाशिक : गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्यात गोदाघाटावरील व्यवसाय करणाऱ्यांच्या टपऱ्या सापडल्याने या व्यावसायिकांनी आपल्या टपऱ्या सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्या.
नदीपात्रालगत छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या अनेकांनी टपऱ्या थाटलेल्या आहेत. काल दुपारी पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने या टपरीधारकांनी आपल्या टपऱ्या सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी धावपळ सुरू केली होती. पुराचे पाणी कायम असल्याने व्यावसायिकांनी आपल्या टपऱ्या दोरीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी स्थलांतरित केल्या. काही टपऱ्या तसेच हातगाड्या हलविण्याची संधी न मिळाल्याने पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. गोदावरीला आलेल्या पुरामुळे गंगाघाटावर व्यवसाय करणाऱ्यांचे व्यवसाय ठप्प झाले. (वार्ताहर)

Web Title: Moves on the Godaghat