मोटारसायकलला कारची धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:14 IST2020-02-29T00:12:49+5:302020-02-29T00:14:02+5:30
मुंबई-आग्रा महामार्गाला समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवरील हॉटेल ग्रीन पार्कसमोर कारने मोटारसायकलला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला.

मोटारसायकलला कारची धडक; एक ठार
ओझर टाउनशिप : येथील मुंबई-आग्रा महामार्गाला समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवरील हॉटेल ग्रीन पार्कसमोर कारने मोटारसायकलला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला.
गुरुवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास आनंदा बापू बारसोडे (५७, रा. सय्यद पिंप्री) हे त्यांच्या युनिकॉर्न मोटारसायकलने (क्र. एमएच १५, एफए ३०१७) दहावा मैलकडून ओझरकडे येत होते. ओझरकडून नाशिककडे जाणाऱ्या मांझा कारने (क्र. एमएच १५, बीसी ०५३२) मोटारसायकलला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात बारसोडे यांच्या डोक्यास व हातापायास गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले.