येवल्यात सवाद्य मिरवणूक

By Admin | Updated: September 5, 2016 23:14 IST2016-09-05T23:08:04+5:302016-09-05T23:14:41+5:30

येवल्यात सवाद्य मिरवणूक

The most popular procession in Yeola | येवल्यात सवाद्य मिरवणूक

येवल्यात सवाद्य मिरवणूक

येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयातीलप्राथमिक विभागातर्फे गणेशाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सवाद्य मिरवणूक काढली होती. तसेच यात मंगळागौरीच्या गीतांवर विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य सादर केले तसेच या नृत्याचे येवले शहरातून नागरिकांकडून तसेच महिलांनी खूपच कौतुक केले. या मिरवणुकीचे विशेष म्हणजे अवयव दानाचे महत्त्व सांगणारे फलक दाखविण्यात आले होते. समाजाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केला तसेच या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या पोषाखातील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. गणेशाची प्रतिष्ठापना गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद नागडेकर यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक सुनेत्रा पैंजणे, संजय जाधव, सतीश कोटमे, महेश बोटके, भानुदास पवार, विक्र म शेळके, प्रसाद वाघ, सुजाता नागडेकर, कल्पना पराते, रवींद्र पाटील, सुनंदा दाणेज, संग्रामसिंह जाधव, जोंधळे, घोडके, राजपूत मॅडम, कुक्कर मॅडम विकास मेहतर, प्रकाश भोरकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: The most popular procession in Yeola