शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार शेतकरीविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:53 IST

नाशिक : केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी, कामगार व व्यापारीविरोधातील निर्णयांविरुद्ध किसान बचाव आंदोलनाचा शुभारंभ राज्याचे महसूलमंत्री व प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत लासलगावी करण्यात आला. यावेळी थोरात यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकार हे शेतकरीविरोधी सरकार असून, उत्तर प्रदेशातील घटना-घडामोडी पाहता देशवासीयांना आता जुलमी सत्तेविरुद्ध नव्या स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

ठळक मुद्देबाळासाहेब थोरात : किसान बचाव आंदोलनाचा शुभारंभ

नाशिक : केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी, कामगार व व्यापारीविरोधातील निर्णयांविरुद्ध किसान बचाव आंदोलनाचा शुभारंभ राज्याचे महसूलमंत्री व प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत लासलगावी करण्यात आला. यावेळी थोरात यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकार हे शेतकरीविरोधी सरकार असून, उत्तर प्रदेशातील घटना-घडामोडी पाहता देशवासीयांना आता जुलमी सत्तेविरुद्ध नव्या स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार असल्याचेही थोरात यांनी सांगितले.यावेळी थोरात यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या विरोधात एक कोटी शेतकरीवर्गाच्या स'ांच्या निवेदनाचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी थोरात पुढे म्हणाले, मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकारने बलात्कारप्रकरणी केलेली दडपशाही निंदणीय असून, योगी सरकार त्वरित बरखास्त करण्यात यावे. मोदी सरकारने शेतकरीविरोधी कायदे केल्याने हे सरकार जनतेच्या व शेतकरी बांधव तसेच महिलावर्गाच्या मनातून उतरले आहे. कांदा उत्पादकांनादेखील कोणत्याही प्रकारचे दर वाढलेले नसतानाही कांदा निर्यातबंदी करून अडचणीत आणले आहे. केवळ मोठ्या उद्योगपतींना फायदा व्हावा या हेतूने सर्वच देशात बाजार समिती व्यवस्था मोडीत काढली जात असल्याचा आरोपही थोरात यांनी केला.सोशल डिस्टन्स ठेवत आंदोलनआंदोलनात महाराष्ट्राचे प्रभारी ए. टी. पाटील, सौ. जयश्री पाटील, महाराष्ट्र युवक कॉँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर, राजाभाऊ पानगव्हाणे, जिल्हा सरचिटणीस दिगंबर गिते, माजी आमदार शिरीष कोतवाल, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, प्रसाद हिरे, विकास चांदर, संजय होळकर, अनिल आहेर, हिरामण खोसकर, अश्विनी बोरस्ते, जगदीश होळकर, पंढरीनाथ थोरे आदींसह कॉँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते. दोन तास चाललेल्या या धरणे आंदोलनात सुमारे दोन हजार शेतकरी व महिला सोशल डिस्टन्स सांभाळत व मास्कसह सहभागी झाल्या होत्या. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण