शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल हिसकावून पळ काढणारे त्रिकूट ताब्यात;१३ मोबाइल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 18:47 IST

या त्रिकुटाने एप्रिलमध्ये गंगापूर, पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन मोबाइल हिसकावून नेल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. १४ हजार, १५ हजार रु पयांचा मोबाइल हिसकावून नेला होता.

ठळक मुद्देपोलिसांनी तपास करून तीघा संशयितांना ताब्यात घेतले.हिसकावून नेलेले १३ महागडे अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइल जप्त केले

नाशिक : दुचाकीस्वार, पादचाऱ्यांचा मोबाइल हिसकावून पळ करणाºया अल्पवयीन चोरट्यांच्या टोळीचा गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने छडा लावला. या टोळीमधील संशयित चोरटा अतीश विजय शहा (१९,रा.रामवाडी) यास अटक केली आहे. तसेच्या त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २ लाख ४७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अतीष हा त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने दुचाकीवर ट्रिपल सीट बसून वेगवेगळ्या परिसरात भटकंती करत दुचाकीवर बोलत जाणाºया किंवा पादचाऱ्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून पळक काढत होते. या त्रिकुटाने एप्रिलमध्ये गंगापूर, पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन मोबाइल हिसकावून नेल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. १४ हजार, १५ हजार रु पयांचा मोबाइल हिसकावून नेला होता. तसेच या त्रिकुटाने डीजीपीनगर ते आंबेडकरनगर सिग्नल दरम्यान सलीम कय्युम शेख (४९, रा. डीजीपीनगर-१) यांच्याकडील मोबाइल हिसकावून पोबारा केल्याचेही निष्पन्न झाले आहे. . या तीनही जबरी चोरीच्या घटनांबाबत मंगळवारी (दि.२०)संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच २५ जून रोजी रात्रीच्या सुमारास एक्सलो पाँइट जवळ तुषार सुधाकर खिल्लारी (२८, रा. अंबड) यांच्याकडील १५हजार रु पयांचा मोबाइल हिसकावून नेला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून तीघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यावेळी या तीघांनी मोबाइल हिसकावल्याचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून विविध गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, हिसकावून नेलेले १३ महागडे अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइल जप्त केले आहेत. पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचीन खैरनार, उपनिरीक्षक बलराम पालकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीArrestअटकAndroidअँड्रॉईडMobileमोबाइल