शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

गारठा कायम : नाशिकचे किमान तापमान ७.६ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:15 IST

सध्या थंडीची तीव्रता कमी झाली असली तरी पहाटे तसेच रात्री थंडी नागरिकांना अनुभवयास येत आहे. पारा सध्या दहाअंशाच्या खाली असल्यामुळे वातावरणात गारठा टिकून आहे.

ठळक मुद्दे प्रखर सुर्यप्रकाशामुळे दिवसभर वातावरणात उष्मा वाढू लागला आहे दोन दिवसांपासून वा-याचा वेग मंदावल्याने कमाल तापमान वाढू लागले

नाशिक : मागील चार दिवसांपासून किमान तापमानाचा पारा वर सरकण्यास सुरूवात झाली असली तरी अद्याप पारा दहा अंशाच्या खाली स्थिरावत असल्यामुळे पहाटे व रात्री नाशिककरांना थंडीचा कडाका जाणवत आहे. कमाल तपमान मात्र २५अंशावरून तीशीपार सरकल्याने सुर्योदय होताच थंडीपासून नागरिकांना दिवसभर काहीसा दिलासा मिळत आहे. गुरूवारी (दि.३) शहराचे किमान तापमान ७.६ तर कमाल तापमान ३१.८ अंश इतके नोंदविले गेले.पंधरवड्यापासून थंडीची तीव्रता शहरात कमालीची वाढली आहे. यावर्षी हंगामातील किमान तापमान नीचांकी ५.१अंशापर्यंत खाली आले होते. तसेच कमाल तापमानदेखील २३अंशापर्यंत घसरले होते. यामुळे थंडीचा कडाका वाढला होता. सध्या थंडीची तीव्रता कमी झाली असली तरी पहाटे तसेच रात्री थंडी नागरिकांना अनुभवयास येत आहे. पारा सध्या दहाअंशाच्या खाली असल्यामुळे वातावरणात गारठा टिकून आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम उत्तर महाराष्टÑातील वातावरणावर होत असून, त्यामुळे नाशिकचे किमान तापमान घसरले आहे. सकाळच्या सुमारास थंडी जाणवत असल्याने जॉगिंग ट्रॅक, जीममध्ये जाणा-यांची संख्या कमी झाली आहे.काही दिवसांपुर्वी शहरात वाहणा-या थंड वा-याचा वेग ताशी दहा किलोमीटर असा होता; मात्र दोन दिवसांपासून वा-याचा वेग मंदावल्याने कमाल तापमान वाढू लागले आहे. प्रखर सुर्यप्रकाशामुळे दिवसभर वातावरणात उष्मा वाढू लागला आहे. त्यामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्या दिवसभर उबदार कपडे परिधान करणाºया नाशिककरांकडून सध्या सकाळ-संध्याकाळ ऊबदार कपडे वापरण्यास प्राधान्य देत आहेत. यंदा डिसेंबरअखेर थंडीचा प्रचंड कडाका नागरिकांना अनुभवयास आल्याने नागरिक त्रस्त झाले होते. गेल्या आठवड्यात नाशिक हे राज्यातील सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नोंदविले गेले होते. शहरात नीचांकी ५ अंशापर्यंत पारा घसरला होता.

टॅग्स :TemperatureतापमानweatherहवामानNashikनाशिक