शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्यक्षपणे एकत्र येण्यावरच निर्बंध : बैठका, व्याख्याने अन् उद्घाटनसुध्दा ‘ऑनलाइन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 16:24 IST

उद्घाटन समारंभ एवढेच नव्हे तर शोकसभांसारखे श्रध्दांजली वाहण्याचे कार्यक्रमसुध्दा या लॉकडाऊनपासून अद्यापपर्यंत ‘ऑनलाइन’ पध्दतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे बदलली जीवनशैली

नाशिक : कोरोनाचे संक्रमण वाढीस लागले अन् एकत्र जमण्यावर निर्बंध आले आहे. विवाह सोहळ्यांपासून अंत्यसंस्कारापर्यंत लोकांच्या कमाल शासकिय स्तरावरून उपस्थिती निश्चित करून देण्यात आली आहे. अशा स्थितीत कार्यालयीन बैठकांपासून चर्चासत्र, व्याख्याने, एखादा उद्घाटन समारंभ एवढेच नव्हे तर शोकसभांसारखे श्रध्दांजली कार्यक्रमसुध्दा या लॉकडाऊनपासून अद्यापपर्यंत ‘ऑनलाइन’ पध्दतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. एकूणच मानवी जीवनशैली बदलून टाकणारा आणि मानवाला खूप काही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे धडे या कोरोनामुळे मिळाले आहे.एकत्र येत समारंभ, चर्चासत्र, कार्यशाळा, व्याख्याने आयोजित करण्यावरच कोरोनामुळे निर्बंध आले. कोरोनाच्या संक्रमणाला गर्दीमुळे निमंत्रण मिळत असल्याने ‘गर्दी टाळा, कोरोना रोखा’ अशाप्रकारे जनजागृती होत आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कोरोनाच्यामुळे आलेल्या या निर्बंधावर सहज मात करता आली आहे. विविध अ‍ॅप्लिकेशनचा वापर करत एकत्र येत ऑनलाइन चर्चा, व्याख्यान, कार्यालयीन दैनंदिन बैठका घेत विचारांची देवाणघेवाण होताना दिसत आहे. एकूणच कोरोनामुळे सार्वजनिक सण, उत्सवांसह सार्वजनिक कार्यक्रमांचे स्वरूपसुध्दा बदलून गेल्याचे चित्र आहे.कोरोना या संसर्गजन्य आजाराचा वाढता फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी सामुहिकरित्या होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घातली गेली. तसेच गर्दीची ठिकाणे, रेल्वेस्थानक, बसस्थानक, प्रार्थनास्थळे अशा सर्वच ठिकाणी योग्य ती काळजी घेतली जात आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थाही पुर्ण क्षमतेने अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. तसेच प्रार्थनास्थळे, पर्यटनस्थळांवरही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.दरम्यान, एकत्र न येता विविध विषयांवरील कार्यक्रम ऑनलाइन पध्दतीने लाइव्ह घेतले जात आहेत. काही दिवसांपुर्वीच देशातील पहिले ‘ई-कोर्ट’चे जिल्हा व सत्र न्यायालयात उद्घाटन करण्यात आले. हा संपुर्ण उद्घाटनसोहळे विशेष लिंकद्वारे लाइव्ह करण्यात आला होता. शोकसभादेखील ऑनलाइन पध्दतीने आयोजित करत मान्यवरांकडून शोकसंदेश व्यक्त केले जात आहेत. शहरातील मंगेश मिठाईचे संचालक दिनेश अग्रवाल यांचे दोन दिवसांपुर्वी निधन झाले. त्यांचा श्रध्दांजलीचा कार्यक्रमही ऑनलाइन घेऊन सर्वांसमोर आगळेवेगळे उदाहरण ठेवले.

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस