शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:50 IST

नियोजन : बंद सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : सोमवार, दि. २४ जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनास बंदोबस्ताचे वेगवेगळे नियोजन करावे लागते. यासाठी जनतेनेही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी केले आहे.पोलीस ठाण्यात बंदोबस्त नियोजनाच्या पार्श्वभूमीवर पालिका पदाधिकारी, नगरसेवक, पोलीसमित्र, जीवरक्षक तसेच त्र्यंबकचे पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष तृप्ती धारणे होत्या. व्यासपीठावर पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक कैलास आकुले, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, सुनील अडसरे, नगरसेवक रवींद्र सोनवणे योगेश तुंगार, संतोष कदम, यशोदा अडसरे, शकुंतला वाटाणे आदी मान्यवर उपस्थित होते. या चर्चेत अनेकांनी सहभाग नोंदविला. पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी बैठकीचा उद्देश सांगितला.रवींद्र सोनवणे यांनी, श्रावण महिना आठ दिवसावर आला आहे. या पार्श्वभूमीवर बिल्वतीर्थावर संरक्षक कथडे देवस्थानने लावावेत तसेच धोक्याच्या सूचनांचा फलकदेखील लावावा, अशा सूचना मांडल्या. यावेळी देवस्थानचे प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य यांनी पोलिसांनी आम्हाला बॅरिकेट्स द्यावीत. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष बिल्वतीर्थाची पाहणी व संरक्षक भिंत उभारण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती दिली.वाहनांना प्रतिबंध घालण्याची मागणीनगरसेवक संतोष कदम यांनी वाहनतळ खंबाळे येथे न करता साधुग्राम येथे करावे. खंबाळेपासून परत त्र्यंबकेश्वर येथे येणे या द्राविडीप्राणायामापेक्षा अगोदर पालिकेचा वाहनतळ भरून मगच दुसऱ्या वाहनतळाचा विचार करावा. तसेच सिंहस्थात कार्यान्वित असलेले सीसीटीव्ही श्रावण महिन्यात पुनश्च सुरू करावेत, तर पंकज धारणे यांनी रिंगरोडने थेट त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागील बाजूला काही वाहने रस्त्यावर उभे राहतात. अशा वाहनांना प्रतिबंध करावा.