शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरेच्या प्रकल्पासाठी रेल्वेमंत्र्यांना भेटणार

By admin | Updated: January 16, 2015 00:01 IST

खासदार हेमंत गोडसे यांनी केली रेल्वेच्या जागेची पाहणी

नाशिक : तत्कालीन रेल्वेमंत्री मधुकर दंडवते यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकालगत असलेल्या २५० एकर जागेत रेल्वेट्रॅक्शन व कारखाना उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून घेतली होती. त्यापैकी आजमितीस सव्वाशे ते दीडशे एकर जागेत रेल्वेचा ट्रान्सफॉर्मर प्रकल्प उभारण्यासाठी आपण केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.काल गुरुवारी (दि.१५) खासदार हेमंत गोडसे यांनी एकलहरे येथील रेल्वेच्या संबंधित जागेची व कारखान्याची पाहणी केली. मधुकर दंडवते रेल्वेमंत्री असताना त्यांनी नाशिकरोडला रेल्वेचे मशीन बनविण्यासाठी २५० एकर जागा उपलब्ध करून घेतली होती. त्यासाठी आठ ते दहा हजार रेल्वे कामगारही कार्यरत झाले होते. मात्र नंतर झालेल्या रेल्वेमंत्र्यांनी त्यांच्या राज्यात प्रत्येक प्रकल्प नेल्याने आजमितीस फक्त पाचशे कामगार कार्यरत असून, एकलहरे येथे कमीत कमी दीडशे खोल्या व एक हॉस्पिटल रिकामे पडले आहे. रेल्वे मंत्रालय त्यांचे काही सुट्टे भाग खासगी कंपन्यांकडून बनवून घेते, त्याऐवजी असे सुट्टे भाग बनविण्याचा कारखाना उभारण्यात यावा, त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. या जागेत ३३० ट्रान्सफार्मरही कार्यरत असल्याने विजेची समस्या उद््भवणार नसल्याचे खासदार गोडसे यांचे म्हणणे आहे. याबाबत आपण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची दिल्ली येथे भेट घेऊन रेल्वेचा प्रकल्प उभारण्याबाबत निवेदन देणार असल्याचेही गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)