शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सात मुस्लीम जोडप्यांचा सामूहिक विवाह

By admin | Updated: February 26, 2017 20:15 IST

मुस्लीम समाजात सामूहिक विवाहाची संकल्पना रुजविणाऱ्या उडान एज्युकेशन अ‍ॅन्ड वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्या वतीने आयोजित सोळाव्या सामूहिक विवाह

नाशिक : मुस्लीम समाजात सामूहिक विवाहाची संकल्पना रुजविणाऱ्या उडान एज्युकेशन अ‍ॅन्ड वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्या वतीने आयोजित सोळाव्या सामूहिक विवाह (इज्तेमाई शादियॉँ) सोहळ्यात सात जोडप्यांचे लग्न पारंपरिक पद्धतीने लावण्यात आले. वडाळारोडवरील मिरजकर मैदानात आयोजित विवाह समारंभाप्रसंगी समाजातील विविध मान्यवर वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने झालेल्या या सोहळ्यामध्ये मौलाना वासिक रजा यांनी ‘निकाह’चा विधी पार पाडला. खतीब-ए-शहर हिसामुद्दीन अशरफी यांनी दुआ करत वधू-वरांचे भावी वैवाहिक आयुष्य सुखा- समाधानाचे जावो, ही सदिच्छा व्यक्त केली. समाजातील गरजू घटकांमधील मुला-मुलींचे विवाह जमवून ते थाटामाटात समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व धर्मगुरूंच्या उपस्थितीत पार पाडणे हा एकमेव उद्देश असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष फजल शेख यांनी यावेळी दिली. दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील नववधू-वरांना संस्थेच्या वतीने एकसमान संसारोपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या. सर्व जोडप्यांबरोबर आलेल्या पाहुण्यांसाठी संस्थेच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या विवाह सोहळ्याप्रसंगी समाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक, वकील, डॉक्टर, उद्योजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.