शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात मराठा समाजाचा मेळावा

By admin | Updated: September 8, 2016 00:47 IST

सटाण्यात मराठा समाजाचा मेळावा

सटाणा : समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी मराठा समाज नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मात्र नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे कायद्याचा दुरुपयोग अराजकता माजवत आहे. असे कायदे रद्द करण्यासाठी समाजाने संघटित होऊन येत्या २४ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित मूक मोर्चात बागलाणच्या समाजबांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रामचंद्रबापू पाटील यांनी केले.या मोर्चाच्या नियोजनासाठी येथील आनंद लोन्स येथे आज मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात करण्यात आला होता. या मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना रामचंद्रबापू पाटील बोलत होते. सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.महाराष्ट्रात सत्तावीस टक्के समाज हा मराठा समाज आहे. असे असताना काही समाज विघातक मंडळी कायद्याचा दुरुपयोग करून अत्याचार करत आहे. यामुळे समाजातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे.ती अबाधित राखण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा व समाजाला आरक्षण जाहीर करावे यासाठी मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी करण गायकर, मविप्रचे उपसभापती नानाजी दळवी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विलास बच्छाव, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, अनिल पाटील, डॉ.प्रशांत पाटील, शैलेश सूर्यवंशी, ज.ल. पाटील, नगरसेवक काका रौंदळ, कुबेर जाधव, भाऊसाहेब अहिरे, कृष्णा भामरे, खेमराज कोर यांची भाषणे झाली.मेळाव्यास जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राघोनाना अहिरे, अरविंद सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, शहरप्रमुख शरद शेवाळे, वसंत भामरे, डॉ.भास्कर भामरे, नंदू सोनवणे, प्रकाश निकम, भाऊसाहेब राजे, मिलिंद शेवाळे, जयप्रकाश सोनवणे, सुहास पवार, पंकज सोनवणे, राहुल सोनवणे, योगेश सोनवणे, विजय सोनवणे यांच्यासह तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)