शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

महंत ग्यानदासांविरोधात विनयभंगाचा गुन्हा

By admin | Updated: September 8, 2016 01:32 IST

न्यायालयाचे आदेश : पंचवटी पोलीस ठाण्यात होणार गुन्हा दाखल

 नाशिक : रामकुंडावर १४ जुलै रोजी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण कार्यक्रमात आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी महादेव वैकुंठधाम मुक्तीद्वार (परी)आखाड्याच्या पीठाधिश्वर त्रिकाल भवंता यांच्याकडून माईक हिसकावून घेत त्यांना बोलण्यास विरोध केला होता़ याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करूनही दाद न मिळाल्याने भवंता यांनी महंत ग्यानदासांविरोधात न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता़ या दाव्याची दखल घेत न्यायालयाने महंत ग्यानदास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पंचवटी पोलिसांना दिले आहेत़ सिंहस्थ ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रामकुंडावरील भव्य स्टेजवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मंत्र्यांकडे आपल्या मागण्या मांडण्यासाठी भवंता यांनी माईक हातात घेऊन बोलण्याचा प्रयत्न केला असता महंत ग्यानदास यांनी आक्षेप घेतला़ यावेळी महंत ग्यानदास यांनी माईक हिसकावून विनयभंग केल्याचा आरोप भवंता यांनी करून पंचवटी पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही केली होती़ जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मंत्रिगणही या तक्रारीची दखल घेत नसल्याने भवंता यांची अ‍ॅड़ मंदार भानोसे यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला होता़ यामध्ये प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी महंत ग्यानदास यांच्या विरोधात विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत़ न्यायालयाच्या आदेशानुसार पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे़ (प्रतिनिधी)