मनमाड : शहर ब्लॉक कॉँग्रेस कमिटीच्या वतीने स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. कॉँग्रेस भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात राजीव गांधी यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष अफजल शेख, नामको संचालक सुभाष नहार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राजीव गांधी यांच्या जीवन चरित्रावर भाषणातून माहिती देण्यात आली. या वेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील, फकीरराव शिवदे, अशोक व्यवहारे , अनिल दराडे, इलीयास पठाण ,अॅड. शशिकांत व्यवहारे,तुळशीराम अहिरे, पोपटराव उगले, सईद दादा,शेख शकील, अन्सार शहा आदि कॉँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.(वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}