शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

अहवालात अनेक बाबींकडे दुर्लक्ष ?मंगला एक्स्प्रेस अपघात : रुळांना तडे गेल्याचे कळवूनही दुर्लक्ष करणाऱ्यांना ‘क्लीन चिट’

By admin | Updated: September 19, 2014 00:44 IST

अहवालात अनेक बाबींकडे दुर्लक्ष ?मंगला एक्स्प्रेस अपघात : रुळांना तडे गेल्याचे कळवूनही दुर्लक्ष करणाऱ्यांना ‘क्लीन चिट’

अहवालात अनेक बाबींकडे दुर्लक्ष ?मंगला एक्स्प्रेस अपघात : रुळांना तडे गेल्याचे कळवूनही दुर्लक्ष करणाऱ्यांना ‘क्लीन चिट’

नाशिक : नोव्हेंबर २०१३ मध्ये घोटी येथे झालेल्या मंगला एक्स्प्रेस अपघाताचा अहवाल तब्बल दहा महिन्यांनी प्राप्त झाला आहे. अहवालात रेल्वेरुळाला तडा गेल्याने अपघात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे; परंतु यास जबाबदार कोण आणि तडा गेल्याबाबतची आगाऊ सूचना देऊनही दुर्लक्ष केल्या प्रकरणाचा ठपका कुणावरही ठेवण्यात आला नसल्याने चौकशीतील महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होऊ लागला आहे. १५ नोव्हेंबर २०१३ रोजी सकाळी घोटी येथे मुंबईकडे जाणारी मंगला एक्स्प्रेस रुळावरून घसल्याने मोठा अपघात झाला होता. त्यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त चेतन बक्षी यांची नेमणूक करण्यात आली होती. बक्षी यांनी नाशिकमध्ये दोन दिवस आणि मनमाड येथेही दोन दिवस या प्रकरणाची चौकशी करून जबाब नोंदविले होते. चौकशीसाठी नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना समोर येण्याचे जाहीर आवाहनही करण्यात आले होते. असे असतानाही अहवाल हा अपेक्षित नसल्याचे काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खासगीत सांगितले. रेल्वे रुळावरून गाडी घसरल्याने दुर्घटना घडल्याचे सांगितले जात असले, तरी रेल्वेरुळाचे ज्याप्रमाणे तुकडे तुकडे झाले त्यावरून या ठिकाणचे रेल्वेरूळ सरकलेले असावेत किंवा त्यांना तडे गेलेले असावेत, असा अनेकांनी जबाब दिलेला होता. विशेष म्हणजे, सदर रेल्वेरुळाची डागडुजी करावी लागेल, असे घटनेपूर्वी दोन महिने अगोदरच येथील गॅँगमनने घोटीचे स्टेशनमास्तर गोगई यांना कळविल्याचे समोर आले होते; मात्र त्याकडे फारसे गांभिर्याने पाहिले न गेल्याने या प्रकरणात मोठा हलगर्जीपणा झाल्याची चर्चा तेव्हाच सुरू होती. घटनेपूर्वी काही दिवस अगोदरच या मार्गावरील मालगाडी थांबविण्यात आली होतीे. रेल्वेरूळ सुस्थितीत नसल्याने किंवा रूळ वाकलेल्या अवस्थेत असल्याने मालगाडी थांबल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. असे असतानाही चौकशीत या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अपघाताच्या काही दिवस अगोदरच जर रुळामधील दोषामुळे गाडी थांबवावी लागली असेल, तर तेव्हाच त्यावर उपाययोजना का करण्यात आली नाही याची नोंद अहवालात नसल्याने आणि त्याविषयी भाष्य नसल्याने काही अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप होत आहे. अर्थात, अहवाल पूर्णपणे प्राप्त झालेला नसला, तरी नेहमीप्रमाणेच अहवालात कुणावरही ठपका ठेवण्यात आला नसावा, असे रेल्वेतील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. अपघाताची चौकशी आणि अहवाल केवळ शासकीय सोपस्कार असल्याचेही खासगीत बोलले जात आहे. (प्रतिनिधी)