शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक औद्योगिक विकासासाठी मुंबईत ‘मेक इन नाशिक’

By admin | Updated: March 30, 2017 00:21 IST

सातपूर : नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी मुंबईत ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाचे नेहरू सेंटर येथे आयोजन करण्यात आले आहे.

सातपूर : नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी मुंबईत ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाचे नेहरू सेंटर येथे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० ते ३१ मे या कालावधीत होणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी दिली. गेल्या १५ ते २० वर्षांपासून नाशिकला एकही मोठा उद्योग प्रकल्प आलेला नसल्याने येथील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बॅनर्जी यांनी सांगितले, विदर्भ, मराठवाड्याला वीजदरात सवलत दिल्याने नाशिकच्या उद्योजकांवर अन्याय झाला आहे. म्हणून नाशिकला मोठे उद्योग प्रकल्प मिळावे, विमानतळाचा प्रश्न मार्गी लागावा, दिंडोरीला दोन वर्षांपासून ४०० हेक्टर जागा संपादित केली असली तरी अद्याप प्लॉटिंग झालेले नाही. अशा अनेक समस्या असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी निमा, एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत मुंबईला मेक इन नाशिक हा उपक्र म राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईतील मोठ्या उद्योगांशी, मर्चन्ट्स एक्स्पोर्ट्स, विविध देशांचे दूतावास यांच्याशी संवाद साधून नाशिकच्या विकासाचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्र माला शासकीय स्तरावर सहकार्य लाभणार आहे, असेही बॅनर्जी यांनी सांगितले.या उपक्र मासाठी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे यांनीही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबईच्या नेहरू सेंटर येथे मेक इन नाशिक उपक्र मात प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमात नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. नाशिकचे ब्रँडिंग करून नाशिकला मोठी गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती निमाचे उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, सरचिटणीस उदय खरोटे, आशिष नहार, ज्ञानेश्वर गोपाळे, हर्षद ब्राह्मणकर, मनीष रावळ, संदीप भदाणे, मोहन सुतार आदिंनी दिली आहे. (वार्ताहर)