अपघाताचा बनाव; तीन लाखांची रोकड लंपास

By Admin | Updated: October 26, 2016 23:30 IST2016-10-26T23:29:17+5:302016-10-26T23:30:15+5:30

अपघाताचा बनाव; तीन लाखांची रोकड लंपास

Make the accident; Cash Lakhs of three lakhs | अपघाताचा बनाव; तीन लाखांची रोकड लंपास

अपघाताचा बनाव; तीन लाखांची रोकड लंपास

नाशिक : ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या कारचा धक्का लागल्याचा बनाव करून चौघा संशयितांनी कारमधील तीन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना बुधवारी (दि़२६) दुपारच्या सुमारास घडली़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महात्मानगर येथील जोसेफ बिजो (२५) यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे़ दुपारी एक वाजेच्या सुमारास ते कारमधून तीन लाख रुपये घेऊन जात होते़ बीवायके महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चौघा संशयितांनी त्यांना अडवून दुचाकीला धक्का का दिला, अशी कुरापत काढून वाद घातला़ या संशयितांशी बोलण्यासाठी जोसेफ कारच्या खाली उतरले असता एका संशयिताने कारमधील तीन लाखांची रोकड लंपास केली़ याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Make the accident; Cash Lakhs of three lakhs