शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार शेतकऱ्यांना मिळणार उच्चदाब जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 16:51 IST

नाशिक : हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युश सिस्टम म्हणजेच उच्चदाब वीज वितरण प्रणालीतून शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून, योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८ हजार शेतकºयांना या प्रणालीचा लाभ होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिली.परिमंडळातील जवळपास ३० हजार शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी देण्यासाठीच्या प्रक्रि येला सुरु ...

ठळक मुद्देनिविदा जाहीर : एचव्हीडीएसमधून होणार २४८ कोटींची कामेपरिमंडळातील जवळपास ३० हजार शेतकऱ्यांना लाभ

नाशिक : हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युश सिस्टम म्हणजेच उच्चदाब वीज वितरण प्रणालीतून शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून, योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८ हजार शेतकºयांना या प्रणालीचा लाभ होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिली.परिमंडळातील जवळपास ३० हजार शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी देण्यासाठीच्या प्रक्रि येला सुरु वात झाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात परिमंडळात होणाऱ्या  ४०९ कोटी रुपये खर्च असलेल्या कामांच्या निविदा महावितरणने प्रसिद्ध केल्या आहेत. यातून नाशिक जिल्ह्यात २४८ कोटी रु पये किमतीच्या कामातून जवळपास १८ हजार शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरणप्रणालीद्वारे वीजजोडणी मिळणार आहे.मार्च-२०१८ पर्यंत पैसे भरून वीजजोडणी प्रलंबित असलेल्या राज्यभरातील अडीच लाख शेतीपंपांना उच्चदाब वीज वितरणप्रणालीद्वारे जोडणी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेतून नाशिक परिमंडळातील २९ हजार ४४० शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे, तर परिसरातील इतर  शेतकऱ्यांना ही योजनेतून होणाºया कामांचा लाभ मिळणार आहे. योजनेत एक किंवा दोन, कमाल तीन कृषिपंप वीजजोडणीसाठी १०, १६ किंवा २५ किलोवॉटचे स्वतंत्र रोहित्र उभारण्यात येणार आहेत.परंपरागत लघुदाब वाहिनीद्वारे दिलेल्या जोडण्यांमध्ये वाहिन्यांची लांबी वाढून गळती वाढते व आकडे टाकून वीजचोरी करण्यास वाव मिळतो. सध्या ६५ व १०० किलोवॉटच्या रोहित्राद्वारे २० ते २५ शेतीपंपांना जोडणी देण्यात येते. या व्यतिरिक्त आकडे टाकून चोऱ्या  करण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. परिणामी रोहित्रांवर ताण येऊन वीजपुरवठ्यात अडथळे व रोहित्र जळण्याचे होण्याचे प्रमाण वाढण्यासोबत योग्य दाबाने वीजपुरवठा होत नाही. उच्चदाब वीज वितरण प्रणालीमुळे या सर्वच समस्या दूर करता येणे शक्य होते.उच्चदाबाने थेट वीजपुरवठा केल्याने गळतीच्या प्रमाणात कमालीची घट होईल व याप्रणालीत आकडे टाकता येणार नसल्याने वीजचोरीला आळा बसेल. एका रोहित्रावर किमान एक व कमाल तीन वीजजोडण्या देण्यात येणार असल्याने रोहित्र नादुरु स्त होण्याच्या  तक्रारी  दूर होतील, योग्य दाबाने वीजपुरवठा शक्य होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण