शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पालिका स्थायी समितीवर ‘महिलाराज’

By admin | Updated: March 13, 2015 00:14 IST

आणखी दोघा महिलांची एन्ट्री : सभापती निवडणुकीचा प्रस्ताव आज होणार रवाना

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीवरील दोघा सदस्यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागांवर अपक्ष आघाडीच्या शेख रशिदा नूरमोहम्मद आणि सेना-रिपाइं युतीच्या ललिता संजय भालेराव यांची निवड महापौरांनी घोषित केली. स्थायीवर दोघा महिलांच्या एन्ट्रीने आता समितीवर सर्वपक्ष मिळून दहा महिलांना प्रतिनिधित्व मिळाले असून, सभापतिपदासाठी पुरुष सदस्यांकडून दावेदारी होत असली तरी वर्षभर महिलाराज पाहायला मिळणार आहे. दरम्यान, सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी नगरसचिव विभागाकडून विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव शुक्रवारी (दि.१३) रवाना केला जाणार असल्याने पुढील आठवड्यात निवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीवरील पक्षीय धोरणानुसार अपक्ष आघाडीचे पवन पवार आणि सेना-रिपाइं युतीचे सुनील वाघ या सदस्यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागांवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी गुरुवारी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. यावेळी अपक्ष आघाडीकडून शेख रशिदा नूरमोहम्मद, तर सेना-रिपाइं युतीकडून रिपाइंच्या ललिता संजय भालेराव यांची नावे गटनेत्यांकडून आल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी दोहोंची निवड घोषित केली. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या दोघा महिलांच्या निवडीने स्थायी समितीवर आता १६ सदस्यांपैकी दहा सदस्य या महिला असणार आहेत. स्थायीवर मनसेच्या सविता काळे, संगीता गायकवाड व रत्नमाला राणे, राष्ट्रवादीच्या नीलिमा आमले व छाया ठाकरे, कॉँग्रेसच्या विमल पाटील, भाजपाच्या रंजना भानसी, शिवसेनेच्या वंदना बिरारी या प्रतिनिधित्व करत आहेत. उर्वरित सदस्यांमध्ये मनसेचे अनिल मटाले, यशवंत निकुळे, राष्ट्रवादीचे शिवाजी चुंबळे, कॉँग्रेसचे राहुल दिवे, भाजपाचे प्रा. कुणाल वाघ आणि सेनेचे सचिन मराठे यांचा समावेश आहे. महापालिका स्थायी समितीच्या इतिहासात आजवर महिला सभापती होऊ शकलेली नाही. यंदा मनसेकडून अनिल मटाले यांच्याबरोबरच संगीता गायकवाड यांचे नाव पुढे आले असल्याने इतिहास घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय राष्ट्रवादीकडूनही अपक्ष शेख रशिदा यांचे नाव पुढे करून डावपेच आखले जात असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, स्थायी समिती मनसेकडेच कायम राखण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असून, राष्ट्रवादीतूनही दावेदारी केली जात आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत चुरस बघायला मिळणार आहे. (प्रतिनिधी)