शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

महंत सुकेणेकरबाबा यांचे निधन

By admin | Updated: March 30, 2017 01:10 IST

कसबे सुकेणे : महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत तथा सुकेणेकर गादीचे महंत श्री सुकेणेकरबाबा (१०५) यांचे बुधवारी पहाटे मौजे सुकेणे दत्त मंदिरातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.

कसबे सुकेणे : महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत तथा सुकेणेकर गादीचे महंत श्री सुकेणेकरबाबा (१०५) यांचे बुधवारी पहाटे मौजे सुकेणे दत्त मंदिरातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. महंत सुकेणेकरबाबा नावाने ते देशभरातील महानुभाव पंथात प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनामुळे महानुभाव पंथावर शोककळा पसरली आहे.  हरेश्वर नाना पाटील असे जन्मनाव असलेले आणि दीक्षेनंतर हरिराज बीडकर म्हणून परिचित, सुकेणेकर गादीचे महंत  सुकेणेकरबाबा यांचा जन्म ८ एप्रिल १९१२ रोजी भिवंडी येथे झाला. मौजे  सुकेणे दत्त मंदिरातील सुकेणेकर  संत परंपरेतील गादीची महंती त्यांच्याकडे होती. जोतिषशास्त्रावर त्यांचा गाढा अभ्यास होता. महानुभावीय वाङ्मयात त्यांचा अभ्यास होता. लीला चरित्र, भगवतगीता या प्राचीन ग्रंथाचे त्यांनी सोप्या भाषेत विश्लेषण केले होते. नाशिकसह राज्यभरातील महानुभावपंथीय मंदिरे, आश्रम यांच्या उभारणीत व पंथीय साहीत्य प्रसार व प्रचारात त्यांचा मोलाचा वाटा होता. राज्यासह पंजाब, मुंबई, गुजरात त्यांचा मोठा शिष्य परीवार आहे. (वार्ताहर) अनंतात विलीनमहंत सुकेणेकरबाबा यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महानुभाव पंथीय विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठण करून महंत सुकेणेकरबाबा यांना अखेरचा निरोप देण्यात आला.