शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महंत ग्यानदास : त्र्यंबकेश्वर येथे भेट

By admin | Updated: January 8, 2015 01:07 IST

ब्रह्मगिरीचा वापर जपून करा

त्र्यंबकेश्वर : गोदावरी स्वच्छ राहावी असे वाटत असेल प्रथम ब्रह्मगिरीच्या पोटाशी बांधकामे, खोदकामे करून माती काढू नका, जेणेकरून भरावामुळे गोदावरीचे पाणी दूषित होणार नाही. नदीपात्र तर दूषित नकोच. गोदावरीला पवित्र मानतात, तिचे पावित्र्य राखा, असे आवाहन महंत ग्यानदास महाराज यांनी केले. बुधवारी महंत ग्यानदास यांचे त्र्यंबक नगरीत आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रथम त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी अहिल्या गोदावरी घाटाची पाहणी केली. तेथून कुशावर्त तिर्थावर गेले. विशेष म्हणजे कुशावर्त तीर्थात उतरण्यास त्यांनी नकार दिला. नंतर आग्रहास्तव उतरून आचमन केले. शहरातील कामकाजाबद्दल त्यांनी अनेक सूचना केल्या. त्र्यंबकेश्वर येथे त्यांचे आतषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी हरित लवादाचे राजेश पंडित, ललिता शिंदे आदि उपस्थित होते. यावेळी त्यांच्या गावातील कोणीही साधू-महंत उपस्थित नव्हते. उलट दशनाम गोटात नाराजी पसरली आहे. त्यांनी सांगितले की, आमच्या कार्यक्षेत्रात आम्ही सक्षम आहोत. त्र्यंबकच्या दहा अखाड्यांतील साधू येथील प्रशासनाशी संवाद साधून असून, कुंभमेळा व्यवस्थित होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. बाहेरच्यांनी येऊन प्रशासनाने काय करावे, काय करु नये असे सुचवू नये. यासाठी आम्ही खंबीर असल्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी सांगितले. (वार्ताहर)