शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

खुळखुळ्या.. ये रताळ्या आरं ऊठ की !

By admin | Updated: September 30, 2016 00:49 IST

सिन्नर : उघड्यावर जाणाऱ्यांना आता ‘आर्ची’चा इशारा

 शैलेश कर्पे सिन्नरउघड्यावर शौचासाठी जाणाऱ्यांना अनेदा गुलाबपुष्प देऊन त्यांचे प्रबोधन करूनही उपयोग होत नसल्याचे पाहून नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने अनोख्या पद्धतीने शहरात बॅनर झळकावल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. या बॅनरवर ‘सैराट’फेम आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरूचे छायाचित्र वापरण्यासह तिच्या गाजलेल्या डायलॉगचा वापर मोठ्या खुबीने करून उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांना गर्भीत इशारा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.अनेक ठिकाणी लावण्यात आलेले ‘आर्ची’चे प्रबोधनात्मक बॅनर सोशल मीडियावर झळकू लागले आहेत. ‘ये खुळखुळ्या.. तुला शौचालयाचा वापर कर म्हणून मराठीत सांगितल्यालं कळत नाही व्हय. का इंग्लिशमध्ये सांगू’ आणि ‘ये रताळ्या.. आरं ऊठ की, तुला कितीदा सांगितलं उघड्यावर बसू नको ते. मराठीत सांगितल्यालं कळत नाही व्हय. का इंग्लिशमध्ये सांगू?’ अशा आशयाचे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.  ठिकठिकाणी लावण्यात आलेले गर्भीत इशाऱ्याचे बॅनर स्वच्छ भारत अभियानासाठी किती उपयोगी पडतील ते माहीत नाही मात्र सोशल मिडियाने ते उचलून धरल्याने त्यांचा चांगला प्रभाव नक्कीच जाणवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे प्रबोधनात्मक बॅनर लावून पालिका प्रशासन थांबले नाही तर पालिकेचे मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास यांनी स्वत: या अभियानात सक्रीय सहभाग घेतला आहे. पहाटेच मुख्याधिकारी दूर्वास यांनी स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेवून सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली. अनेक ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयांची दूरवस्था झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अनेक ठिकाणी भांडी फुटली आहेत, पाण्याचे हौद तुटले आहेत, वीजेची व्यवस्था नाही, वेळच्या वेळी साफसफाई होत नसल्याचे निदर्शनास आले. यासंबंधीचे सर्व कामे तात्काळ करण्याचे आदेश सफाई विभागाच्या ठेकेदाराला देण्यात आले आहेत. त्याचबरोबर उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांना समज देण्यात आली.