शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कमी पाण्यात फुलवली डाळींबबाग

By admin | Updated: August 21, 2014 00:16 IST

कमी पाण्यात फुलवली डाळींबबाग

येवला : गेल्या२१ वर्षांपासून निसर्गाने साथ न दिल्याने अल्पपर्जन्यमान असले तरी कमी पाण्यात डाळिंबाची बाग फुलवून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अनुकूलता साधली. कमी पाणी असूनसुद्धा शेतीत नवनवीन प्रयोग केले म्हणूनच सुखी जीवन जगत असल्याची प्रतिक्रिया उद्यानपंडित पुरस्कार प्राप्त नेवरगाव, ता. येवला येथील शेतकरी सुरेश काशीनाथ कदम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. कदम यांनी फलोत्पादन शेतीत भरीव कार्य केल्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना उद्यानपंडित पुरस्कार देऊन नुकतेच नाशिक येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविले. उत्तर महाराष्ट्रातून त्यांची एकमेव निवड झाली. स्वत:च्या दोन हेक्टर क्षेत्रात ‘गणेश १३७’ या जातीचे डाळिंबाची रोपे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून आणली व कमी पाण्यात डाळिंबाची बाग फुलवली. कांदा, फळपिके या सगळ्यांसाठी ठिबक सिंचनाचा वापर करून मोठे उत्पन्न घेतले. पिके काढल्यानंतर फळांची प्रतवारी केली. त्यामुळे चांगला बाजारभाव मिळाला. सेंद्रिय व रासायनिक खतांचा समतोल वापर केला, गांडूळखत, हिरवळीचे खत, बायोडायनामिक कंपोस्ट, जैविक खते व बुरशीनाशकांचाही वापर केल्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहून भरघोस उत्पन्न मिळाल्याचे कदम यांनी सांगितले. पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवीन तंत्रज्ञान वापरून बाग फुलविली. मिरची, टमाटे, वांगी यांसह झेंडूची लागवड करून कमवलेल्या पैशामध्ये मुलांच्या शिक्षणाचा मार्ग खुला केला. शेतीव्यवसायात खचून न जाता व आत्महत्त्येचा पळकु टा मार्ग न स्वीकारता कमी पाण्यातही शेती फुलवून सुखी जीवन जगू शकतो. हा आदर्शपाठ कदम यांनी घालून दिल्यामुळे परिसरात अनेक शेतकरी त्यांचे मार्गदर्शन घेऊन शेती करतात.कमी पाऊस पडतो म्हणून निसर्गाला दोष देत बसण्यापेक्षा प्रयोगशीलतेतून शेती करावी, असा सल्लाही शेतकऱ्यांना सुरेश कदम यांनी दिला आहे.(वार्ताहर)