शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

सायगाव परिसरात खरीप हंगाम तोट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 18:55 IST

सायगाव : चालू हंगामात सायगावसह उत्तर पूर्व भागात गेल्या चाळीस वर्षांचा विक्रम मोडत विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, मूग, भुईमूग, सोयाबीन, लाल कांदा, भाजीपाला आदी शेतमालाचे मोठे नुकसान झाले. उत्पादन खर्चाची आकडेमोड केली तरी हाती कवडीही शिल्लक राहात नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : उत्पादन खर्चाचा अन् बाजारभावाचा बसेना मेळ

सायगाव : चालू हंगामात सायगावसह उत्तर पूर्व भागात गेल्या चाळीस वर्षांचा विक्रम मोडत विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, मूग, भुईमूग, सोयाबीन, लाल कांदा, भाजीपाला आदी शेतमालाचे मोठे नुकसान झाले. उत्पादन खर्चाची आकडेमोड केली तरी हाती कवडीही शिल्लक राहात नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.यंदा प्रत्येक नक्षत्रात कोसळणाऱ्या पावसाने प्रत्येक पिकाची धूळधाण केली. गाठीला असलेल्या लाल कांद्याचे बियाणे, रोपे वाया गेली.चढ्या दराने आणलेले विविध कंपन्यांचे बियाणे शेतात टाकले. मात्र पावसाच्या माºयाने निम्मी आर्धी कांदा रोपे सडली. या परिस्थितीतही संकटावर मात करत शेतकऱ्यांनी थोड्याफार लाल कांद्याची लागवडी केली. मात्र पावसाने संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. एकरी पंचवीस हजार रुपयांचे नुकसान शेतकºयांना सोसावे लागले. रोजच्या पावसाच्या माºयाने मूग, भुईमूग, बाजरी काळी पडली आहे. परिणामी सात हजार रुपये दराने विकली जाणारी मूग दीड-दोन हजार दराने विकावी लागली. २१०० रुपयांचा हमीभाव असणारी बाजरी आठशे ते हजार रुपये दराने विकाी गेली. निम्म्या मालाचे शेतातच नुकसान झाले. बाजरी, मकाचा चारा खराब झाला. आता सायगाव परिसरात मका कापणीचा हंगाम सुरू आहे.रब्बी हंगाम उभा करण्यासाठी शेतकरी मातीमोल दरात शेतमाल विकत आहे. केवळ आठशे ते हजार रुपये दराने मक्याची विक्री करण्याची वेळ आली आहे. शेतमशागतीपासून ते बाजारापर्यंत मका पिकाचा एकरी उत्पादन खर्च ३० हजार रुपये झाला आहे. सरासरी उत्पादनही केवळ तीस क्विंटल पदरात पडत आहे. नदीकाठच्या जमिनी उपळल्याने तेथील पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. केवळ कपाशी पिकावरच शेतकºयांची सर्व भिस्त अवलंबून आहे. उन्हाळ कांदा बियाणांचा तुटवडा असल्याने रब्बी हंगामात पुन्हा कोणते पिके घ्यावे, हा प्रश्न शेतकरीवर्गाला भेडसावत आहे. (०४सायगाव)

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी