दुष्काळ पाहणी दौ-याकडे अधिका-यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 05:10 PM2019-05-06T17:10:05+5:302019-05-06T17:10:27+5:30

पालकमंत्र्यांची हतबलता : लोकप्रतिनिधींचा मात्र सुकाळ, तक्रारींचा पाऊस

Lessons of the officers to the drought survey tour | दुष्काळ पाहणी दौ-याकडे अधिका-यांची पाठ

दुष्काळ पाहणी दौ-याकडे अधिका-यांची पाठ

googlenewsNext
ठळक मुद्दे आचारसंहितचा बाऊ करुन अधिकारी उपस्थित राहत नसल्याची हतबलता खुद्द पालकमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखविली

शैलेश कर्पे, सिन्नर : राज्यातील लोकसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौ-याचे नियोजन केले. मात्र आचारसंहिता अद्याप संपली नसल्याचे कारण देत विविध तलाठ्यांपासून प्रांताधिका-यांसह विविध खात्याच्या शासकीय अधिका-यांनी पालकमंत्र्यांच्या दौ-याकडे अक्षरश: पाठ फिरवली. आचारसंहितचा बाऊ करुन अधिकारी उपस्थित राहत नसल्याची हतबलता खुद्द पालकमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखविली. अधिका-यांविना पालकमंत्र्याच्या दुष्काळ पाहणी दौ-यात मात्र लोकप्रतिनिधींचा ‘सुकाळ’ दिसून आला.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौ-यास सिन्नर तालुक्यातून प्रारंभ केला. त्यापूर्वी आपण अधिका-यांना सोबत येण्यासाठी बोललो होतो असे महाजन म्हणाले. मात्र आचारसंहितेचे कारण देत एकही अधिकारी दुष्काळाच्या दौ-यात सहभागी झाला नाही. शेतकरी एक सांगतात, अधिकारी वेगळं बोलतात. सर्वजण समोरासमोर नसल्याने अडचणी वाढल्या. दरवेळी फोनवर अधिका-यांना बोलून सूचना देणे अवघड झाल्याची हतबलताही पालकमंत्र्यांनी बोलून दाखविली.
तालुक्यातील भोकणी, पांगरी, वावी व पंचाळे या दुष्काळी गावांना भेटी दिल्यानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी अक्षरश: तक्रारींचा पाऊस पाडला.

Web Title: Lessons of the officers to the drought survey tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.