शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागातील जंगलात गिरविले वनौषधींचे धडे

By admin | Updated: September 26, 2016 02:10 IST

खोरीपाडा : पर्यावरण शाळेच्या पहिल्या वर्गाला प्रतिसाद; विविध औषधी वनस्पतींची जाणून घेतले गुणधर्म

नाशिक : निसर्गातील वनौषधी आणि त्यांचे विविध गुणधर्मांची माहिती करून घेण्यासाठी आपलं पर्यावरण संस्थेच्या पंधरा सदस्यांनी हरसूल जवळील खोरीपाड्याला भेट दिली. मागील चाळीस वर्षांपासून वनौषधींद्वारे निसर्गोपचार करणारे ज्येष्ठ वैद्य शंकर शिंदे यांनी या सदस्यांना जंगलाची भ्रमंती घडवत वनौषधींची ओळख करून दिली.शहरापासून ५५ किलोमीटरवर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खोरीपाडा येथे पर्यावरण शाळेच्या पहिला वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सात महिला, आठ युवक या पर्यावरण शाळेमध्ये सहभागी झाले होते. वैद्य शिंदे यांनी जंगलामधील विविध वनौषधींची माहिती सांगितली. खोरीपाडा ही चारशे लोकसंख्या असलेली लहान वस्ती आहे. या आदिवासी पाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील आदिवासी गावकऱ्यांचे निसर्गावर असलेले प्रेम. या गावातील लोकांनी येथील वृक्षसंपदा, जैवविविधता जोपासण्याचा वसा घेतला आहे. वनविभागाच्या मदतीने गावकऱ्यांनी गावाच्या डोंगराच्या पायथ्याशी गिधाड भोजनालय यशस्वीपणे सुरू ठेवले आहे. आयुर्वेदशास्त्र हे वनौषधीवरच आधारलेले आहे. आदिवासी भागामध्ये आजही वनौषधींची माहिती असलेले आणि त्याद्वारे मुक्या प्राण्यांपासून तर माणसांपर्यंत आरोग्य उपचार करणारे वैद्य कार्यरत आहेत. या वैद्यांकडे वनौषधी व त्याचे गुणधर्म या विषयीचे प्रचंड ज्ञान असून अनुभवाने त्यांनी ते मिळविले आहे. या ज्ञानाचा फायदा आजच्या शिकलेल्या आधुनिक युगातील पिढीला व्हावा आणि निसर्गातील वनौषधींची जोपसना उत्तरोत्तर होत जावी, या उद्देशाने ‘पर्यावरण शाळा’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपलं पर्यावरण संस्थेने यासाठी पुढाकार घेत व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून सदर संकल्पना संस्थेशी जोडलेल्या शेकडो सदस्यांपर्यंत पोहचविली आहे. यापैकी ज्यांना निसर्ग जाणून घेण्याची आवड आहे, अशा सदस्यांनी नोंदणी करत सहभाग घेतला. प्रत्येक वर्गाला पंधरा सदस्यांची मर्यादा ठेवण्यात आली असून, लवकरच दुसरा वर्ग पेठ तालुक्यातील पाड्याभोवतालच्या जंगलामध्ये आयोजित केला जाणार आहे.