शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी कडवाचे आवर्तन सोडा

By admin | Updated: September 20, 2014 00:37 IST

शेतकऱ्यांची मागणी : उन्हाचा तडाख्याने कोमजू लागली पिके

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप हंगामातील पिके उन्हाच्या तडाख्याने कोमेजू लागली आहेत. पावसाअभावी जलस्रोत ठणठणीत कोरडे पडल्याने पिके वाचविण्यासाठी पाटबंधारे विभागाने खरीप हंगामासाठी कडवा कालव्याचे आवर्तन सोडावे, अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन पाटबंधारे विभागाचे अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले आहे. या भागातील खडांगळी, मेंढी, निमगाव (देवपूर) पंचाळे, पिंपळगाव (धनगरवाडी), श्रीरामपूर (शिंदेवाडी), रामपूर (पुतळेवाडी), उज्जनी आदि परिसर कडवा कालव्याच्या सिंचन लाभ क्षेत्रात येत आहे. मात्र या भागात गेल्या तीन वर्षांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. यंदा सलग चौथ्यावर्षीही त्याची पुनरावृत्ती झाल्याने केवळ रिमझिम पावसावर पेरण्या उरकल्या आहेत. अत्यल्प पावसावर पिके जोमदार आली असली तरी आता उन्हाची तीव्र वाढू लागली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने या भागातील नद्या, बंधारे, पाझरतलाव व विहिरी आदि जलस्रोत ठणठणीत कोरडे पडले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील ऐन बहरात आलेल्या खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी पाणी कसे द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. तालुक्याच्या पश्चिम व इगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने कडवा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्याचे ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले होते. मात्र ते पाणी पिकांना देण्यात आले नाही. आता पूरपाणी बंद करण्यात आले आहे. रिमझिम पावसाने उघडीप दिली असून, भाद्रपदातील कडक उन्हाची तीव्र वाढली आहे. उन्हामुळे पिके कोमेजू लागली असून, त्यांना पाण्याची गरज आहे. आता पाणी मिळाले नाही, तर यंदाचा खरीप हंगामही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यंदा दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. त्यातही हा पाऊस तालुक्याच्या पश्चिम भागातच समाधानकारक झाला आहे. पूर्व भागात यंदा एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने जलस्रोत भरले नाही. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. विहिरींना पाणी नाही. ‘विहिरीतच नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार’ या उक्तीप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी कडवाच्या आवर्तनाचा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाने पूर्वभागातील पिके वाचविण्यासाठी कालव्याला त्वरित आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे बाबासाहेब सापनर, रवींद्र पगार, पिंपळगावचे सरपंच गोवर्धन शिंदे, उज्जनीचे सरपंच नारायण सापनर, धनंजय थोरात, शिवाजी तळेकर, दत्ता पगार, निमगाव विकास संस्थेचे अध्यक्ष नवनाथ मुरडनर, किसन सापनर, भागवत सोनवणे, पुतळेवाडीचे सरपंच आबा जाधव, उपसरपंच सोपना वाईकर, कल्याण गिते, बाळासाहेब खैरनार आदींसह परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (वार्ताहर)