शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला किमान तीन हजार रु पये प्रतिक्ंिवटल भाव हवा

By admin | Updated: July 21, 2014 01:10 IST

कांद्याला किमान तीन हजार रु पये प्रतिक्ंिवटल भाव हवा

 

लासलगाव : केंद्र सरकार कांदा भाववाढीचा मोठा गहजब करीत असून, कांदा उत्पादकांच्या बाबतीत सरकार रडीचा डाव खेळत आहे. शहरी ग्राहकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जर सरकार कांद्यावर निर्बंध लादणार असेल तर कांद्याला किमान तीन हजार रुपये प्रतिक्ंिवटल भाव द्यायलाच हवा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केली आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागप्रमुख कालिदास आपटे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले, बाळासाहेब पटारे, शंकर गायकवाड, लासलगाव खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम मेमाणे, लासलगाव बाजार समितीचे सचिव बी. वाय. होळकर आदिंसह शेतकरी संघटनेचे राज्यातील महत्त्वाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
निवडणूक काळात भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा देण्याचे जाहीर केले होते. सध्या कांद्यासह इतर शेतमालाच्या बाजारभावाची परिस्थिती पाहता केंद्रातील सरकार आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासत असून, शेतकरी संघटना ही फसवणूक कदापि सहन करणार नसल्याचा सुतोवाच शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा हा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, असे पाटील म्हणाले.
ज्या वस्तूंचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत केला जातो त्या मालाला हमीभाव देणे बंधनकारक आहे. कांद्याला जीवनावश्यकच्या यादीत टाकण्याच्या घोषणेला पंधरवडा उलटून गेला तरी हमीभाव जाहीर न झाल्याने केंद्र शासनाच्या कांदा विषयक धोरणाविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष खदखदत असल्याचे चित्र आहे.
जर शासन तीन हजार रुपये हमीभाव देणार नसेल तर सरकारने कांद्याच्या बाबतीत हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. गारपिटीमुळे उन्हाळ कांद्याचे एकरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून, सध्या कांद्याचे दर वाढले असल्याचे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.