पोलीस ठाण्यात महिला प्रतिसाद अ‍ॅपचा शुभारंभ

By Admin | Updated: July 4, 2016 00:16 IST2016-07-03T22:41:02+5:302016-07-04T00:16:55+5:30

पेठ : वृक्षदिंडी, वृक्षारोपण करून केली जागृती

Launch of Women's Response App in Police Station | पोलीस ठाण्यात महिला प्रतिसाद अ‍ॅपचा शुभारंभ

पोलीस ठाण्यात महिला प्रतिसाद अ‍ॅपचा शुभारंभ

 पेठ : महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाड आदिंवर आळा बसावा तसेच पीडित महिलांना तत्काळ पोलीस यंत्रणेशी संपर्क करता यावा यासाठी पोलीस विभागाच्या वतीने महिलांसाठी ‘प्रतिसाद’ नावाचे अ‍ॅप तयार करण्यात आले़
याचा शुभारंभ येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पोलीस निरीक्षक विजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाजार समिती उपसभापती श्यामराव गावित, नगरसेवक चेतन निखळ, कुमार मोंढे, विक्र म चौधरी, योगेश राऊत, भगवान पठाडे, पोलीस उपनिरीक्षक मुंढे, प्राचार्य ए. एम. बागुल यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.
पेठ पोलीस स्टेशनच्या वतीने पेठ शहरातून कलापथकाच्या साहायाने वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आली तसेच पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पेठ शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, सांस्कृतिक
मंडळे, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
(वार्ताहर)

Web Title: Launch of Women's Response App in Police Station