शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

वसाकाच्या गळीत हंगामाचा १५ ला शुभारंभ

By admin | Updated: November 14, 2016 00:35 IST

वसाकाच्या गळीत हंगामाचा १५ ला शुभारंभ

देवळा / लोहोणेर : गतवर्षी मोठ्या प्रयत्नांंनी सुरू झालेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची चाके या वर्षी कर्जपुरवठ्याअभावी फिरतील काय, अशी शंका उपस्थित केली जात होती. परंतु वसाका सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, येत्या १५ डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वसाकाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व वसाका प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. राहुल अहेर यांनी दिली. कारखान्याच्या प्राधिकृत मंडळाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मागील गळीत हंगाम यशस्वी केल्यानंतर आगामी गळीत हंगामासाठी सुमारे तीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. देवळा येथे शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार डॉ. अहेर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती थकीत कर्जांमुळे खालावली होती. यामुळे गतवर्षी वसाका सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर ९३ हजार टन उसाचे गाळप करण्यात येऊन नासिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यात आली होती. यामुळे चालू वर्षी जिल्हा बँक वसाकाला कर्जपुरवठा वेळेवर करेल व कारखाना सुरळीतपणे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व सभासद होते. परंतु जिल्हा बँकेने निधीअभावी वसाकाला वित्तपुरवठा करण्यात असमर्थता व्यक्त केली होती. यामुळे वसाकाच्या प्रशासकीय मंडळाच्या सदस्यांपुढे गतवर्षी सुरू केलेला वसाका चालूवर्षी सुरू राहण्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? ही समस्या उभी राहिली. आगामी गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू व्हावा यासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी आमदार डॉ. राहुल अहेर सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत होते. नुकत्याच ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला ही बाब वसाकाच्या पथ्यावर पडली. कर्ज भरणापोटी जिल्हा बँकेने रद्द झालेल्या नोटा शासनाच्या निर्देशानुसार स्वीकारण्यास सुरु वात केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बँकेत भरणा सुरू झाला व आर्थिक संकटात सापडलेली जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली. यामुळे वसाकाला कर्ज पुरवठा करण्याबाबत जिल्हा बँक राजी झाली असून, वसाकाला कर्ज पुरवठा केला जाणार आहे. यामुळे १५ डिसेंबर रोजी वसाकाचा गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू होणार आहे. (वार्ताहर)