शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी येथे इंडिया ग्रेप हारवेस्ट व वाइन फेस्टिव्हलचा फेस्टिव्हलचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:54 IST

दिंडोरी : इंडिया ग्रेप हारवेस्ट व वाइन फेस्टिव्हलचा शुभारंभ दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे दिमाखात झाला.

ठळक मुद्देवाइन फेस्टिव्हलची संकल्पना विशदशेतमालाचे विपणन थेट ग्राहकांपर्यंत

दिंडोरी : इंडिया ग्रेप हारवेस्ट व वाइन फेस्टिव्हलचा शुभारंभ दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे दिमाखात झाला. सदर महोत्सवानिमित्त ११ मार्चपर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी शुक्रवार, शनिवार व रविवार विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, अनिल कदम, माजी आमदार माणिकराव कोकाटे, सह्याद्रीचे विलासराव शिंदे, पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष माणिकराव पाटील, कैलास भोसले, रवींद्र बोराडे, जगन खापरे, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, प्रवीण जाधव आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.प्रास्ताविक करताना फेस्टिव्हलचे आयोजक जगदीश होळकर यांनी वाइन फेस्टिव्हलची संकल्पना विशद केली. यावेळी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी शेतमालाचे विपणन थेट ग्राहकांपर्यंत होणे गरजेचे असल्याचे सांगितले. जगभरात द्राक्षामुळे नाशिकची नवी ओळख निर्माण झाली आहे. ग्रेप फेस्टच्या निमित्ताने जिल्ह्याच्या व्यापार, पर्यटनास चालना मिळणार आहे. सह्याद्रीने शेतकºयांना एकत्रित करत त्यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक शेतमालासाठी इंडस्ट्री उभी करण्याची गरज असल्याचे सह्याद्रीचे विलास शिंदे यांनी सांगितले. पर्यटन विकास महामंडळाचे आशुतोष राठोड यांनी बोलताना सह्याद्री फार्मने शेतकरी व ग्राहक दोघांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, सह्याद्री हे एक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत असून, त्यास अधिकृत पर्यटन क्षेत्र म्हणून दर्जा देत विकसित करण्याचे आश्वासन यावेळी राठोड यांनी दिले. यावेळी बोलताना आमदार देवयानी फरांदे यांनी विलास शिंदे यांनी उभारलेल्या या कामाला सलाम करत भविष्यात शासन त्यांच्या या कामासाठी नक्कीच मदत करेल, असे आश्वासन दिले.इंडिया ग्रेप फेस्टचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश महाजन व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार होता; मात्र काही कारणास्तव ते अनुपस्थित होते, हा धागा पकडत आपल्या भाषणात आमदार अनिल कदम यांनी शेतकºयांसाठी होत असलेला हा कार्यक्रम असून, त्यांनी यायलाच हवे होते असे सांगितले. यानंतर उत्सव सह्याद्रीचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.