भगूर ते शिर्डी पालखी यात्रेचा शुभारंभ

By Admin | Updated: December 28, 2016 01:23 IST2016-12-28T01:23:14+5:302016-12-28T01:23:25+5:30

भगूर ते शिर्डी पालखी यात्रेचा शुभारंभ

Launch of Bhagur to Shirdi Palkhi Yatra | भगूर ते शिर्डी पालखी यात्रेचा शुभारंभ

भगूर ते शिर्डी पालखी यात्रेचा शुभारंभ

देवळाली कॅम्प : भगूर श्री रेणुका माता मंदिर ते शिर्डी श्री साई पालखी पदयात्रेचा ओम साई रामच्या जयघोषात शुभारंभ झाला.
ओम साईराम मित्रमंडळाकडून गेल्या नऊ वर्षांपासून भगूर श्री रेणुका मंदिरपासून शिर्डीपर्यंत श्री साई पालखीचे आयोजन करण्यात येते. पालखी व पादुकाचे पूजन तानाजी भोर, उषा भोर यांच्या हस्ते श्री रेणुका माता मंदिरात महाआरती करून करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक दीपक बलकवडे, श्याम कदम, श्याम ढगे, चंद्रकांत कासार, बबन आव्हाड, अ‍ॅड. बाळासाहेब आडके, दिनेश गोविल, विलास पाटील, कैलास आडके, नितीन गिरी, उल्हास गुरुळे आदि मान्यवर उपस्थित हाते. पाहुण्यांच्या हस्ते पदयात्रेत सहभागी झालेल्या साईभक्तांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)ठिकठिकाणी स्वागतपदयात्रेत देवी-देवतांच्या वेशभूषेत राहुल दोंदे, सोमनाथ अहेर, अर्जुन संगमनेरे, प्रमोद कुवर, सागर वाजे, दिलीप मोरे, सागर संगमनेरे, गोपाळ कोकाटे, अतुल बिरजे, जितू पावशे, राजेंद्र श्रीवंत सहभागी झाले होते. मंदिरापासून निघालेल्या साई पालखीचे विजयनगर गजानन महाराज मंदिर परिसरात स्वागत केले.

Web Title: Launch of Bhagur to Shirdi Palkhi Yatra