Lasalgaon burnt, victim death in hospital of Mumbai | Breaking : लासलगाव जळीतप्रकरण, पिडीतेचा मुबईतील रुग्णालयात मृत्यू

Breaking : लासलगाव जळीतप्रकरण, पिडीतेचा मुबईतील रुग्णालयात मृत्यू

लासलगाव (नाशिक)- तालुक्यातील पिंपळगाव नजिक येथील जळीत प्रकरणातील पिडितेचे मुंबई येथे मसीना बर्न हॉस्पीटल येथे शनिवारी पहाटे उपचार सुरू असतांना निधन झाले.  मागील शनिवारी ही जळीत घटना लासलगाव येथिल बसस्थानकात घडल्यानंतर नाशिक येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असतांना सदर महिलेची प्रकृती खालावली. त्यामुळे तीस मुंबई येथे मसीना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

पिडीतेचे नातेवाईकांनी तिचे अंत्यसंस्कार लासलगाव अमरधाम येथे करण्याचा निर्णय घेतला आहे असे तपास अधिकारी लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी सांगितले. जे जे हॉस्पीटल येथे तिची शवचिकित्सा करण्यात येत असुन त्यानंतर तिचा मृतदेह शववाहीकेतुन लासलगाव येथे आणणार आहे.
 

 

Web Title: Lasalgaon burnt, victim death in hospital of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.