के.पी.जी. महाविद्यालयात एन.सी.सी प्रमाणपत्र वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 17:25 IST2020-10-02T17:24:36+5:302020-10-02T17:25:28+5:30

घोटी : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांना बी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

K.P.G. Allocation of NCC certificate in the college | के.पी.जी. महाविद्यालयात एन.सी.सी प्रमाणपत्र वाटप

के.पी.जी. महाविद्यालयात एन.सी.सी प्रमाणपत्र वाटप

ठळक मुद्देभाऊसाहेब खातळे, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड आदींनी मनोगत व्यक्त केले.

घोटी : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांना बी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बी प्रमाणपत्र अभ्यासक्र म पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. भाबड, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक भाऊसाहेब खातळे, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी एनसीसीचे प्रमुख प्रा. एस. एस. परदेशी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. यू. एन. सांगळे यांनी केले.

Web Title: K.P.G. Allocation of NCC certificate in the college