भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 07:09 IST2026-05-16T07:09:44+5:302026-05-16T07:09:44+5:30

हा प्रकल्प ‘श्री स्थूलिभद्र श्रेष्ठ सुदर्शन जैन श्वेतांबर मणि लक्ष्मी तीर्थ’ या नावाने विकसित केला जात आहे.

108 feet tall statue of Lord Mahavira to be erected in Patna | भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  

भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  

एस. पी. सिन्हा, पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील गुलजारबाग स्टेशनजवळील कमलादाजी परिसरात भव्य जैन तीर्थक्षेत्र आणि सांस्कृतिक संकुलाचे बांधकाम सुरू आहे. येथे भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती स्थापित केली जाईल. ही मूर्तीमध्ये देशभरात एक प्रमुख धार्मिक आकर्षण केंद्र बनणार आहे.
 
हा प्रकल्प ‘श्री स्थूलिभद्र श्रेष्ठ सुदर्शन जैन श्वेतांबर मणि लक्ष्मी तीर्थ’ या नावाने विकसित केला जात आहे. दिनेशभाई शाह जीर्णोद्धार आणि विकासकामांवर देखरेख करत आहेत. या स्थळाचा (पावापुरीनंतर) एक प्रमुख जैन तीर्थक्षेत्र म्हणून विकास केला जात आहे.

संगमरवरात आध्यात्मिक अन् सांस्कृतिक केंद्र

सुमारे १,००,००० चौरस फूट क्षेत्रफळात हे मंदिर संकुल पांढऱ्या संगमरवराचे असून, त्यात कोरीव काम आहे. 

भगवान महावीरांच्या मूर्तीची उंची ७२ फूट निश्चित करण्यात आली आहे. 

ही मूर्ती ३६ फूट उंच कमळावर असेल, त्यामुळे एकूण उंची १०८ फूट होईल. 

हे तीर्थक्षेत्र पूजास्थळ म्हणून न राहता, एक संपूर्ण आध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित केले जाईल. 

या संकुलात एक चित्र दालनही असेल, ज्यात जैन जग, तीर्थंकर, आचार्य स्थूलिभद्र स्वामी व श्रेष्ठी सुदर्शन स्वामी यांचे जीवनचरित्र प्रदर्शित केले जाईल.

Web Title : पटना में बनेगी भगवान महावीर की 108 फीट ऊंची मूर्ति

Web Summary : पटना, बिहार में एक भव्य जैन तीर्थस्थल का निर्माण हो रहा है। यहाँ भगवान महावीर की 108 फीट ऊंची मूर्ति स्थापित की जाएगी, जो जैन इतिहास को दर्शाते हुए एक प्रमुख धार्मिक और सांस्कृतिक केंद्र बनेगी।

Web Title : 108-Foot Tall Lord Mahavir Statue to be Built in Patna

Web Summary : A grand Jain pilgrimage site is under construction near Patna, Bihar. It will feature a 108-foot tall statue of Lord Mahavir, set to become a major religious attraction with a spiritual and cultural center showcasing Jain history.

टॅग्स :Biharबिहार