शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कोराटे येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 17:49 IST

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील दिगंबर वामन कदम या शेतकऱ्यांने सततच्या नापिकीला तसेच कर्जाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

ठळक मुद्देविषारी कीटकनाशकाची बाटली आढळून आली.

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील दिगंबर वामन कदम या शेतकऱ्यांने सततच्या नापिकीला तसेच कर्जाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.दिंडोरी तालुक्यातील गट नंबर ३०८ मध्ये शेतामध्येच वास्तव्यास असलेल्या शेतकरी दिगंबर वामन कदम यांच्या मुलाने सहा महिन्यांपूर्वी द्राक्षबागेत पाच रुपयांनी द्राक्षबाग गेल्यामुळे आत्महत्या केली होती. मात्र असे असले तरी दिगंबर कदम यांच्या आपल्या तीन मुलींचे लग्न यापूर्वीच झाली आहे, तर एक मुलगा दत्तात्रय लष्करी सेवेत गुजरात बॉर्डरवर आहे.कदम यांनी द्राक्षबाग नुकतीच नापिकीमुळे तोडून टाकली आहे. सध्या शेतात कुठल्याही प्रकारचे उत्पन्न नसल्याने मुलगा गेला आपला जगून काही उपयोग नाही, असा विचार ते नेहमी करत होते.मंगळवारी (दि.२४) रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून ते घराबाहेर पडले. रात्रभर घरी न परतल्याने त्यांचा बुधवारी (दि.२५) सकाळी तपास सुरू झाला. या दरम्यान पत्नी सुशीला यांना दिगंबर कदम हे घराजवळच ज्याठिकाणी मुलगा बापू कदम याने आत्महत्या केली होती त्या जागेपासून काही अंतरावर झोपलेल्या स्थितीत दिसले व शेजारी विषारी कीटकनाशकाची बाटली आढळून आली.त्यानंतर त्यांना तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सकाळी अकराला नाशिक ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले.विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे त्यांच्यावर साडेतीन लाख रुपये व मध्यवर्ती बँकेचे कर्ज असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले.‌ दिगंबर कदम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. एकाच घरामध्ये कर्जबाजाराला कंटाळून मुलाचे व वडिलांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (फोटो २८ दिगंबर कदम)

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस