शेतकरी हिताविरोधी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी सटाणा : किसान क्रांती मोर्चातर्फे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:39 IST2020-12-04T04:39:45+5:302020-12-04T04:39:45+5:30

केंद्र शासनाने केलेले तीन कृषी विधेयक कायदे शेतकर्‍यांसाठी अन्यायकारक आहेत. ते तिन्ही विधेयक कायदे तत्काळ रद्द करावेत, हमीभावासाठी कायदा ...

Kisan Kranti Morcha issues statement to tehsildar | शेतकरी हिताविरोधी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी सटाणा : किसान क्रांती मोर्चातर्फे तहसीलदारांना निवेदन

शेतकरी हिताविरोधी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी सटाणा : किसान क्रांती मोर्चातर्फे तहसीलदारांना निवेदन

केंद्र शासनाने केलेले तीन कृषी विधेयक कायदे शेतकर्‍यांसाठी अन्यायकारक आहेत. ते तिन्ही विधेयक कायदे तत्काळ रद्द करावेत, हमीभावासाठी कायदा करावा, वीज विधेयक मागे घ्यावे या मागण्यांसाठी केंद्र शासनाच्या विरोधात देशातील शेतकर्‍यांनी नवी दिल्ली येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. हे नवे कृषी कायदे शेतकरी हिताविरोधी असून, त्यामुळे शेतकरी आणि शेती व्यवसायाचे कधीही न भरून येणारे नुकसान होईल. शेतकरी देशोधडीला लागतील. त्यामुळे शेतकर्‍यांचा या कायद्यांना विरोध आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकर्‍यांशी केंद्र शासनाने चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शेतकरी क्रांती मोर्चाचे नेते आणि नाशिक जिल्हा वकील फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. पंडितराव भदाणे, नाना भामरे, जिभाऊ निकम, कौतिक निकम, नंदकुमार देवरे, मनोहर निकम, संदीप बागुल, दौलत सोनवणे, ॲड. प्रणव भामरे, ॲड.नीलेश डांगरे, ॲड. शोनकुमार देवरे, किशोर राणे, विजय अहिरे, महेंद्र निकम, गोविंद निकम, भगवान पिंपळसे, दिलीप निकम, दादाजी निकम आदी उपस्थित होते.

===Photopath===

031220\03nsk_21_03122020_13.jpg

===Caption===

 केंद्र शासनाच्या अन्यायकारक कृषी कायद्यांच्या निषेधार्थ नायब तहसिलदार डी. के.बहिरम यांना निवेदन देताना ॲड. पंडितराव भदाणे, नाना भामरे, कौतिक निकम, जिभाऊ निकम आदि.०३ सटाणा १

Web Title: Kisan Kranti Morcha issues statement to tehsildar