शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

माघारीसाठी ‘खल’बते सुरूच

By admin | Updated: November 12, 2014 23:46 IST

स्थायी समिती सदस्य निवडणूक : विशेष बैठकीची प्रतीक्षा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या दोन सदस्यांच्या रिक्त पदांची निवड करण्यासाठी आता आठवडा उलटूनही अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांना स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांच्या रिक्त पदांसाठी निवडणूक घेण्यासाठी विशेष बैठकीची तारीख जाहीर करू शकलेल्या नाहीत.दरम्यान, बुधवारीही (दि.१२) स्थायी समिती सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजपा सदस्य मनीषा बोडके यांचे पती श्याम बोडके यांच्याशी शिक्षण व आरोग्य सभापती किरण थोरे यांचे पती पंढरीनाथ थोरे यांनी बंद दाराआड चर्चा केली. विशेष म्हणजे या चर्चेस शिवसेना गटनेते प्रवीण जाधव, राष्ट्रवादीचे सदस्य गोरख बोडके हेही उपस्थित होते. थोरे-बोडके यांच्या चर्चेचा रोख मनीषा बोडके यांच्या माघारीवरच असल्याचे समजते. प्रत्यक्षात काय चर्चा झाली, हे सांगण्यास कोणीही नकार दिला, तर निवडणूक बिनविरोध झाली नाही, तर आपणही माघार घेणार नाही, असा पावित्रा राष्ट्रवादीच्या सदस्य संगीता राजेंद्र ढगे यांनी घेतल्याने स्थायी समितीच्या दोन जागांच्या निवडीचा घोळ आणखीनच वाढला आहे.विशेष म्हणजे विषय समिती वाटप व सदस्य निवडीसाठी बोलविण्यात आलेल्या विशेष सभेत अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी स्थायी समितीच्या दोन जागांसह उर्वरित विषय समित्यांच्या २० जागांसाठी एकूण ४२ अर्ज दाखल झाल्याने अध्यक्ष विजयश्री चुंबळे व उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांना ही विशेष सभा विषय समित्यांचे वाटप झाल्यानंतर अन्य विषय समित्यांच्या रिक्त जागांची निवड न करताच तहकूब करण्याची नामुष्की आली होती. आता आठवडा उलटूनही स्थायी समितीच्या दोन रिक्त जागांसाठी एकमत होत नसल्याने विशेष सभेची तारीख जाहीर झालेली नाही. (प्रतिनिधी)