कोलकाता मॅरेथॉनमध्ये कविता राऊत प्रथम

By Admin | Updated: December 29, 2014 01:27 IST2014-12-29T01:26:32+5:302014-12-29T01:27:08+5:30

कोलकाता मॅरेथॉनमध्ये कविता राऊत प्रथम

Kavita Raut first in Kolkata Marathon | कोलकाता मॅरेथॉनमध्ये कविता राऊत प्रथम

कोलकाता मॅरेथॉनमध्ये कविता राऊत प्रथम

  नाशिक : कोलकाता येथे झालेल्या २५ किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत हिने १ तास ३३ मिनिट वेळ नोंदवत कोलकाता मॅरेथॉनमध्ये अजिंक्यपद पटकावले़ नुकतेच मुंबईची मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या कविताने आपल्या कामगिरीत सातत्य राखत क्रीडा विश्वाचे लक्ष वेधून घेतले. टाटा स्टिलच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ आज सकाळी झालेल्या या मॅरेथॉनमध्ये कविता व रेल्वेची धावपटू सुधा सिंग यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती ती दोघींनीही अखेरपर्यंत टिकवून ठेवली; परंतु अखेरच्या ५०० मीटरमध्ये कविताने सुधाला मागे टाकत विजयावर शिक्कामोर्तब केले़ यामध्ये तिने १ तास ३३ मिनिट आणि ३९ सेकंद वेळ नोंदवला, तर तिला टक्कर देत सुधा सिंगने १ तास ३३ मिनिटे ४३ सेंकद वेळ नोंदवत उपविजेतेपद मिळवले़ मनीषा साळुंके १ तास ३६ मिनिट वेळ नोंदवत तृतीयस्थानी राहिली़

Web Title: Kavita Raut first in Kolkata Marathon