शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कथकली, कलरीपायटूला दाद

By admin | Updated: August 25, 2016 00:30 IST

गोपीक्रिष्ण जयंती नृत्य महोत्सवाचा उत्साहात समारोप

 नाशिक : सम्राट अशोकाचे युद्ध कौशल्य, त्याच्या अंगी असलेली लवचिकता, साम्राज्य हस्तगत झाल्यावर सम्राट अशोकाच्या अंगात भिनलेला गर्विष्ठपणा, याच गर्विष्ठपणामुळे सम्राट अशोकाला वैयक्तिक आयुष्यात होणारा पश्चाताप आणि पश्चातापातून अशोक राजा अध्यात्माच्या वाटेकडे कसा वळतो याचा अनोखा प्रवास बेंगळुरू येथील नृत्य कलाकार तेजेशकुमार एम. यांनी आपल्या नृत्यातून सादर केला. बुधवारी (दि. २४) महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित गोपीक्रिष्ण जयंती नृत्य महोत्सवात त्यांनी आपली कला पेश केली.तेजेशकुमार एम. यांनी कलरीपायटू ही नृत्यकला सादर करताना ‘आर्यसच्चा’ या संकल्पनेतील नृत्य सादर केले. यावेळी दु:ख, समुदाय, निरोदा आणि मगा या चार महान सत्यातून सम्राट अशोकाचा जीवनपट नृत्यकलेतून उलगडून दाखविण्यात आला. कलरीपायटू या नृत्य कलेतून युद्ध कौशल्याचे दर्शन तेजेशकुमार यांनी घडविताना आपल्या लवचिक शरीरयष्टीतून साहसी, क्रोधीत स्थळांचे दर्शन घडवून रसिकांची विशेष दाद मिळवली. नृत्याविष्काराबरोबरच विद्युत रोषणाईचा अगदी चपखलपणे वापर करून समकालीन नृत्य आणि कलरीपायटू या दोन्ही नृत्याचा मिलाफ सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले.नृत्यमहोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात केरळ येथील कलाकार रेनजीश नायर आणि नारायणन नेदुमबल्ली यांनी कथकली नृत्यप्रकाराचे सादरीकरण केले. या कथकली नृत्यातून बकासुराच्या वधाची कथा सादर करण्यात आली. फक्त चेहऱ्यावरील हावभाव आणि डोळ्यांची केलेली वैशिष्ट्यपूर्ण हालचाल यातून हा प्रसंग उत्कृष्टरीत्या नृत्यकलाकारांनी मांडला. भीम आणि बकासूर यांच्यातील युद्धाचा प्रसंग वर्णन करताना दोन्ही कलाकारांमध्ये रंगलेल्या जुगलबंदीला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पंडित गोपीक्रिष्ण जयंती महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला. या महोत्सवाअंतर्गत कुचीपुडी, कथक, ओडीसी, भरतनाट्यम्, कलरीपायटू आणि कथकली या नृत्यप्रकारातून भारतीय नृत्यशैलीचे विविध पैलू अनुभवायला मिळाले. (प्रतिनिधी)