महिला गटातील कबड्डीत थायलंड विजयी

By Admin | Updated: August 2, 2014 01:23 IST2014-08-02T00:05:05+5:302014-08-02T01:23:06+5:30

कबड्डीलाही यावेत सुवर्ण दिन : भुजबळ

Kabaddi in Women's Group Thailand won | महिला गटातील कबड्डीत थायलंड विजयी

महिला गटातील कबड्डीत थायलंड विजयी

 नाशिक : महाराष्ट्राचा मर्दानी खेळ म्हणून प्रसिद्ध असलेली कबड्डी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचली आहे़ लवकरच आॅलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश होऊन कबड्डीला सुवर्ण दिन येतील, अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केली़
विभागीय क्रीडा संकुल येथे थायलंड कबड्डी संघाच्या दौऱ्याचे उद्घाटन करताना भुजबळ बोलत होते़ आज झालेल्या प्रारंभाच्या सामन्यात थायलंडच्या संघाने क्रीडा प्रबोधिनीच्या संघाचा पराभव करत विजयी सलामी दिली, तर मुलींच्या गटात मुंबईच्या देना बँकेच्या संघाने अवघ्या एक गुणाने थायलंडचा पराभव केला़
भुजबळ म्हणाले, कबड्डी संघ आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचविण्यासाठी योगदान देणारे कै .बुवा साळवी व इतर खेळाडूंना याचे श्रेय द्यावे लागेल़ कबड्डीच्या विकासासाठी उद्योजक, राजकीय लोक व संस्थांनी सहकार्य करावे़ लवकरच यातील खेळाडूंना क्रिकेटप्रमाणे प्रतिष्ठा व पैसे मिळतील. यामुळे अधिकाधिक खेळाडूंनी या खेळात सहभागी व्हावे, असे आवाहन केले़ याप्रसंगी भुजबळ यांच्या हस्ते उत्कृष्ट पंचाचा पुरस्कार मिळविणारे पंच सतीश सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला़
आज झालेल्या पहिल्या सामन्यात थायलंडच्या संघाने यजमान क्रीडा प्रबोधिनी संघाचा ५१-३९ असा १२ गुणांनी पराभव क रत विजयी सलामी दिली़ थायलंड संघाच्या कोमसन व टीन पांचू यांनी उत्कृष्ट चढाया करत २३ गुण वसूल केले़ पहिल्या डावात थायलंडच्या संघाने प्रबोधिनीचे २० खेळाडू बाद करत एक बोनस गुण मिळवला, तसेच दोन लोन करत चार गुण असे २५ गुण मिळवले, तर क्रीडा प्रबोधिनीने सात गडी बाद करत पाच बोनस गुण वसूल केले. परंतु दोन लोन झाल्याने १२ गुणांवरच समाधान मानावे लागले़ यामुळे पहिल्या डावातच थायलंडने १३ गुणांची आघाडी घेतली़ दुसऱ्या डावात थायलंडने २२ गडी बाद करत दोन लोन केले व २६ गुण मिळवले, तर प्रबोधिनीचे किरण दरेकर, नीलेश चौधरी, योगीराज जाधव, सौरभ पाटील यांनी पराभव टाळण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी थायलंडचे २० गडी बाद करत पाच बोनस गुण घेतले. तसेच एक लोन करत चिवट झुंज देऊन दुसऱ्या डावात २७ गुण मिळवले़ अशा प्रकारे दुसऱ्या डावात प्रबोधिनीने एक गुणाने आघाडी घेतली. परंतु पहिल्या डावातील आघाडीमुळे थायलंडने हा सामना १२ गुणांनी सहज खिशात घातला़ याप्रसंगी आमदार जयंत जाधव, जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आमदार उत्तमराव ढिकले, राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील, उपाध्यक्ष राम मोहिते, कार्यवाह रमेश देवाडीकर, क्रीडा उपसंचालक जगन्नाथ अधाने, प्रकाश बोराडे, थायलंड संघाचे प्रशिक्षक डॉ़ रमेश भेंडगिरी, स्पर्धा निरीक्षक मुजफ्फ र अली सय्यद आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Kabaddi in Women's Group Thailand won