शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

मंचाकडे धाव घेणाऱ्या वीज ग्राहकांना झटका

By admin | Updated: November 15, 2015 23:31 IST

अर्ज फेटाळला : हस्तक्षेप करण्यास मंचाचा नकार

नाशिक : वीज बिलाबाबतच्या तक्रारीबाबत वीज कंपनीच्या अंतर्गत ग्राहक तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार केल्यानंतर पुन्हा तीच तक्रार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाकडे दाखल करून न्याय मागणाऱ्या वीज ग्राहकांना मंचाने झटका देत त्यांच्या तक्रारी फेटाळून लावल्या आहेत. मनमाडचे यशवंत निंबाजी संसारे यांनी या संदर्भात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, वीज कंपनीने मीटरचे रिडिंग न घेता त्यांना चुकीचे देयक दिले होते व त्यासंदर्भात तक्रार केली असता, त्याची दखल घेतली नाही, परिणामी मानसिक स्वास्थ्य बिघडून त्यापोटी कराव्या लागलेल्या औषधोपचारासाठी २५ हजार रुपये तसेच मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये व चुकीचे वीज देयक आकारल्याने ४८ हजार ३८५ रुपये वसूल करून मिळावेत, अशी मागणी केली होती. संसारे यांच्या तक्रारीची दखल घेत वीज कंपनीच्या वतीने कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. मनोजकुमार हगवणे यांनी कंपनीची बाजू मांडली. त्यात त्यांनी म्हटले की, भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम ४२ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत ग्राहक तक्रार निवारण कक्षाकडे संसारे यांनी तक्रार केली होती व त्यावर निर्णयही देण्यात आला आहे. संसारे यांना हा निर्णय मान्य नसेल तर ते विद्युत लोकपाल यांच्याकडे अपील करू शकतात, परंतु त्यांनी तसे न करता एक सारख्या तक्रारीसाठी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे धाव घेणे बेकायदेशीर ठरते त्यामुळे त्यांची तक्रार फेटाळण्यात यावी, अशी विनंती केली. संसारे यांच्याप्रमाणेच मनोज पिंगळे यांनी रवींद्र विद्या प्रसारक मंडळासाठीदेखील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे तक्रार केली होती. त्यात त्यांनी शासनमान्य शैक्षणिक संस्थेला शासकीय अनुदान मिळते व त्यातून संस्था शैक्षणिक खर्च भागवत असते, संस्थेला ५० वर्षांपासून घरगुती वापराच्या दराने वीज आकारले जात असताना मार्च २०१२ पासून संस्थेला वीज बिल व्यावसायिक दराने आकारले जात असून, संस्थेने आजपावेतो ५७ हजार २९० रुपये वीज देयक अदा केले. त्यामुळे संस्थेने सुरक्षिततेपोटी भरलेली ५७,२९० रुपये परत मिळावेत व शारिरीक, मानसिक त्रासापोटी ५० हजार रुपये परत मिळावेत, अशी विनंती केली होती. या अर्जावरही सुनावणी होऊन वीज कंपनीच्या वतीने अ‍ॅड. मनोज हगवणे पाटील यांनी बाजू मांडताना उपरोक्त दाखला दिला व जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रारदार तोच मुद्दा पुन्हा उपस्थित करू शकत नसल्याचे सांगून, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने आॅक्टोबर २००९ पासून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना वाणिज्य दराने वीज बिले देण्याच्या संदर्भात टेरिफ आॅर्डर केलेली असल्याचे सांगितले. न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे व सदस्या प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी यांनी वीज कंपनीचा युक्तिवाद ग्राह्य धरत दोन्ही अपिले फेटाळून लावली आहेत. (प्रतिनिधी)