शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने हिरावला सणाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:32 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात गेली दहा-पंधरा दिवसापासून होत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने सोयाबीन, कापूस, मका, कांदा रोपे, कांदा पिकांची दाणादाण झाल्याने ऐन दसरा-दिवाळीला शेतकऱ्यांचा आनंद हिरावून नेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मका, सोयाबीन पिकांचे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाओ आहे.

ठळक मुद्देयेवला तालुक्‍यात परतीच्या पावसाने खरिपाची दाणादाण

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात गेली दहा-पंधरा दिवसापासून होत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने सोयाबीन, कापूस, मका, कांदा रोपे, कांदा पिकांची दाणादाण झाल्याने ऐन दसरा-दिवाळीला शेतकऱ्यांचा आनंद हिरावून नेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मका, सोयाबीन पिकांचे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाओ आहे. अनेक शेतकऱ्यांनी मका सोंगून ठेवलेला आहे तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची गंजी मारून ठेवलेली आहे. चार चार वेळेस कांदा बियाणे टाकूनही जमिनीवर येण्याच्या अगोदरच मुसळधार पावसाच्या तडाख्याने झोडपल्याने कांदा बियाणे संपुष्टात येऊन हजारो रुपये खर्च वाया गेल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले असून, शेतकऱ्यांना कांदा पिकाला मुकावे लागणार असून, अगोदरच लावलेला पोळ कांदा नष्ट झालेला असताना कांदा पीक संकटात सापडले आहे तर अनेक शेतकऱ्यांचे मुसळधार पावसाने मका ,कापुस, सोयाबीन ,कांदा पिक पाण्यात असून, एकूणच खरिपातील पिकांची दानादान झाल्याने शेतकरी दसरा-दिवाळीच्या आनंदावर पाणी सोडून खरिपातील पिके वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.गेली दहा- पंधरा दिवसापासून परतीच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सोंगणीसाठी आलेले मका,सोयाबीन ,व कापुस या पिकांना मात्र त्याचा फटका बसत असून पिके संकटात सापडल्याने शेतकरी दरवर्षी दसरा या सणाला सोने वाटून आनंद साजरा करत असतो पण यावर्षी मात्र कोरोना संकटानंतर आता परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने दसरा सणा वर विरजण पडले आहेत. 

 

 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी