शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

जयशंकर - तपोवन चौफुली धोकादायक

By admin | Updated: September 6, 2016 01:19 IST

अपघाताची भीती : सुसाट धावणाऱ्या वाहनांचा धोका

नाशिक : टाकळी मार्गावरील जयशंकर-तपोवन चौफुली येथून सुसाट वेगाने वाहने जात असल्यामुळे सदर मार्ग धोकादायक बनला आहे. या मार्गावरून मार्केट कमिटीत जाणाऱ्या पिकअप टाकळी, द्वारकावरील नियमित वाहतूक आणि तपोवनकडे भाविकांच्या वाहनांची वर्दळ सुरू राहते. या वाहनांना जयशंकर-तपोवन चौफुलीवरून जावे लागते. वाहनधारक येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांकडे न बघता सुसाट वेगाने वाहने नेत असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. द्वारकाकडून टाकळी गावात जाण्यासाठी आणि ड्रिमसिटीकडून तपोवनकडे जाण्यासाठी वाहनधारकांना या चौकातून जावे लागते. टाकळी, द्वारका आणि तपोवनकडे जाण्यासाठी हा शॉर्टकटही असल्याने या मार्गावरील वाहतूक वाढली आहे. पंचवटीत दर्शनासाठी येणारे भाविकही शहराचा प्रवास टाळून टाकळी-तपोवन मार्गाने पंचवटीकडे जात असतात. त्यामुळे भाविक वाहनांचीदेखील वर्दळ सुरू असते. वाळू, दगड वाहून नेणारी चोरटी वाहतूकही याच मार्गावरून होत असते. अलीकडे अवजड वाहनांची वर्दळ या मार्गावरून सुरू असते. त्यामुळे तर धोका अधिकच वाढला आहे. या मार्गावर कुठेही गतिरोधक नसल्यामुळे वाहनधाकरांना रान मोकळे झाले आहे. विशेषत: भाजीपाला वाहतूक करणाऱ्या पिकअप व्हॅन चालकांना चौकातून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेता येत नसल्यामुळे अपघाताचे प्रकार घडत आहेत. सुदैवाने मोठा अपघात घडला नसला तरी वाहनचालकांची बेजबाबदारी आणि गतिरोधक नसल्यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. (प्रतिनिधी)