शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बनावट राजमुद्रित लोगो तयार करणाऱ्याचा लावला तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 00:27 IST

वणी : लोकप्रतिनिधीच्या नावाचा बनावट राजमुद्रित लोगो केलेल्या ठिकाणाचा शोध तपास यंत्रणेने लावला असून नाशिकच्या रेडीअमचा व्यवसाय करणाऱ्या व या प्रकरणाबाबत अज्ञात असलेल्या व्यावसायिकास पोलिसांनी तोतयागिरी करणाऱ्या राहुल आहेर याच्या गुन्ह्यात साक्षीदार बनवले आहे.

ठळक मुद्देवणी : राहुल आहेर तोतयागिरी प्रकरण

वणी : लोकप्रतिनिधीच्या नावाचा बनावट राजमुद्रित लोगो केलेल्या ठिकाणाचा शोध तपास यंत्रणेने लावला असून नाशिकच्या रेडीअमचा व्यवसाय करणाऱ्या व या प्रकरणाबाबत अज्ञात असलेल्या व्यावसायिकास पोलिसांनी तोतयागिरी करणाऱ्या राहुल आहेर याच्या गुन्ह्यात साक्षीदार बनवले आहे.राजमुद्रित लोगो वाहनावर लावून आमदाराच्या अविर्भावात वावरणाऱ्या राहुल आहेर याची इनोव्हा कार ताब्यात घेतल्यानंतर घटनाक्रमाची मालिकाच पोलिसांसमोर उभी राहिली आहे.त्या संशयास्पद इनोव्हा कारमधून एका शिक्षण संस्थेला अनुदान देण्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष यांचे नोटपॅड व माजी आमदाराचे ओळखपत्र आढळून आल्यानंतर या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू असताना थेट मंत्रालयात वजन असल्याचे भासवत काहींना गळाला लावले व त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या तक्रारदारांना साक्षीदार करण्यात आले.तद्नंतर नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात राहुल आहेर व एका युवतीविरोधात तक्रार दिलेल्या युवतीने वणी पोलीस ठाण्यात येऊन आपबिती कथन केल्याची माहिती मिळाली, मात्र सदर प्रकरण फसवणूक व बनावटीकरण याचे असल्याने पोलिसांनी त्या युवतीचा जबाब पुराव्यादाखल घेतला, अशी माहिती मिळाली आहे.दरम्यानच्या कालावधीत राहुल आहेर याचे बँक खाते तसेच त्यातील आर्थिक उलाढाल व अर्थस्रोत याबाबत बारकाईने पोलिसांनी केलेल्या तपासातून बाहेर आलेल्या माहितीमुळे राहुलच्या पोलीस कोठडीत वाढ होत असल्याची वदंता आहे.दरम्यान, राजमुद्रित लोगो, स्टीकर, लोगो तयार करणाऱ्याची माहिती संकलित करताना त्या व्यावसायिकास अंधारात ठेवून दिशाभूल करून असत्य माहिती सत्य असल्याचे भासवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्या व्यावसायिकाकडून सदर कागदपत्रे तयार करून घेतल्याची बाब पुढे आल्याने त्या व्यावसायिकास या प्रकरणाचा साक्षीदार करण्यात आले आहे.हायप्रोफाइल प्रकरण असल्याने प्राप्त माहिती पुराव्याशी जोडत सखोल व योग्य दिशेने सुरू असलेल्या वणी पोलिसांचा तपास मार्गक्रमण करत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी अग्रक्रम दिला आहे.राहुल आहेर याच्या बँक खात्याच्या तपशिलाअन्वये किरकोळ रकमांची उलाढाल दिसत असली तरी मोठ्या रकमांचा तपशील संकलित करताना या रकमा कोणाकडून कशासाठी घेतल्या याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, काहींनी उधारीवर या रकमा दिल्याची प्राप्त माहिती यंत्रणेला असली तरी याबाबत संलग्न चौकशी सुरू आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर करणारे कमी नाहीत, असे अनेक तथाकथित आहेत. त्यात राहुल आहेरच्या निमित्ताने हे प्रकरण उघड झाले एवढेच.या प्रकरणाचा छडा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी लावल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड स.पो.नि. स्वप्निल राजपुत, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे यांनी या प्रकरणाचा केलेला तपास हा स्थानिक गुन्हे शाखेइतकाच महत्त्वाचा आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश वराडे यांनी राहुल आहेर याच्या विरोधात राजमुद्रित लोगो वापराची फिर्याद दिल्यानंतर पुढे आलेला तपासाचा घटनाक्रम वणी पोलिसांचे मनोबल उंचावणारा आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी