शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथांऐवजी इंटरनेट, मोबाइल झाले तरुणांचे गुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:25 IST

ग्रंथ हा असा खजिना आहे की, ज्याच्यामुळे वाचक समृद्ध होतो. तसेच ग्रंथ मानवी आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे ग्रंथ हेच खरे गुरू असल्याचे म्हटले जाते. परंतु सध्याच्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियामुळे ग्रंथांऐवजी मोबाइल, इंटरनेट तरुणांचे गुरू झाल्याचे दिसून येत असून, वाचनालयाकडे मुलांचा व तरुणाईचा ओढा कमी झाला आहे.

पुस्तक  दिन विशेष

नाशिक : ग्रंथ हा असा खजिना आहे की, ज्याच्यामुळे वाचक समृद्ध होतो. तसेच ग्रंथ मानवी आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे ग्रंथ हेच खरे गुरू असल्याचे म्हटले जाते. परंतु सध्याच्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियामुळे ग्रंथांऐवजी मोबाइल, इंटरनेट तरुणांचे गुरू झाल्याचे दिसून येत असून, वाचनालयाकडे मुलांचा व तरुणाईचा ओढा कमी झाला आहे. तरुणाईचा पुस्तकांऐवजी मोबाइल व अन्य साधनांकडे कल वाढल्याने स्मार्टफोनच्या युगात शहरातील सार्वजनिक वाचनालयात ज्येष्ठ नागरिकांचीच वर्दळ अधिक दिसून येते.वाचनालयात नव्या पिढीचे दर्शन फारच दुर्मीळ झाले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांना विविध विषयांवरील पुस्तकांचा आढावा घ्यावा लागतो. यासाठी लागणारी पुस्तके सहज उपलब्ध होत असतात. तरीही या सोशल मीडियाच्या दुनियेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मोजकीच मुले वाचनालयाची वाट चोखाळताना पहायला मिळत आहे. जे काही पुस्तकांचा वापर करतात त्यात बहुतांश तरुण खासगी करिअर अकॅडमीच्या मार्गाने अभ्यास करतात.त्यामुळे आजच्या तरुणांनी वाचनालयांकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. पूर्वी उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की खेळ खेळणे, मामाच्या गावाला जाणे, मौजमस्ती करणे, पोहणे, सायकल चालवायला शिकणे, दिवसातून तासभर वेळ काढून वाचनालयात जाऊन कादंबरी, महापुरुषांच्या कथा वाचन करणे आदी कार्यक्रम ठरलेले असायचे. पण काळानुरूप यात बदल झाला. संगणक व मोबाइलचे युग आले. मुले तासन्तास मोबाइलचा वापर करू लागली. याशिवाय टीव्ही, नेट कॅफेवर अनेक मुले बसलेले दिसून येतात. त्यामुळे वाचनालयाकडे येणारी तरुण पिढीची पावले आता सायबर कट्ट्यावर स्थिरावल्याने ‘वाचाल तर वाचाल’ ही संस्कृतीच आता काळाच्या ओघात मागे पडते की काय अशी चिंता ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.ज्येष्ठांकडून चिंताएके काळी ज्ञानाचा विस्तार करण्याचे केंद्र म्हणून वाचनालयाची ओळख होती. यात दिवसभर युवकांची गर्दी पहायला मिळत असे. परंतु स्मार्टफोनच्या युगात या वाचनालयात उतारवयातील लोक दिसतात. नवीन पिढी वाचनाला फारसे महत्त्व देत नसल्यामुळे वाचन संस्कृती हरपत चालल्याची चिंता ज्येष्ठांकडून व्यक्त होत आहे.वाचनालयात येणाºया वाचकांपैकी ज्येष्ठ नागरिकांची सख्या अधिक असून रंजक कथा, कादंबऱ्यांना ज्येष्ठ नागरिकांकडून पसंती मिळते. यात प्रामुख्याने चरित्र ग्रंथ वाचणाºया तरुणांसोबतच काव्यसंग्रह आणि ऐतिहासिक पुस्तकांना मागणी अधिक असते. - नितीन बोरसे, ग्रंथपाल, सार्वजनिक वाचनालय, नाशिकनियमित ग्रंथालयात येऊन पुस्तके वाचणाºयांपैकी ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. तुलनेत तरुणांची संख्या कमी असली तरी काही साहित्यप्रेमी तरुणही आवर्जून आपल्या आवडीची पुस्तके निवडून घेण्यासाठी नियमित येतात. सध्या वाचकांची सस्पेंस कादंबºयांना अधिक पसंती आहे. इतर रंजक कथा, कादंबºया, काव्यसंग्रहांचीही वाचकांकडून मागणी होत आहे. मात्र आध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथांची मागणी करणारे वाचक तुलनेत खूपच कमी आहे.- योगीता भांबरे, ग्रंथपाल, नाशिक

टॅग्स :libraryवाचनालयMobileमोबाइलInternetइंटरनेटNashikनाशिक